चीनच्या संभाव्य हल्ल्याविरोधात तैवानकडून किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी युद्धसरावाची घोषणा

युद्धसरावाची घोषणातैपेई/बीजिंग – गेल्या चोवीस तासात चीनची 25 लढाऊ विमाने आणि चार गस्तीनौकांनी तैवानच्या हद्दीजवळ मोठी गस्त घातली. तैवानने आपली विमाने आणि विनाशिका रवाना करून चीनला पिटाळून लावले. पण चीनच्या या कारवाया तैवानवरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा इशारा लष्करी विश्लेषक देत आहेत. यामुळे सावध झालेल्या c

चीनची तैवानच्या विरोधातील आक्रमकता वाढत चालली आहे. सुरुवातीला तैवानच्या हवाईहद्दीपर्यंत लढाऊ विमाने रवाना करणाऱ्या चीनने आत्ता गस्तीनौका आणि विनाशिका रवाना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर चीनची विमाने आणि जहाजे तैवानच्या मिडियन लाईनपर्यंत घुसखोरी करीत असल्याचे आरोप तैवानने केले होते. तर चीनने आपल्या ॲम्फिबियस युद्धनौका तैवानच्या दिशेने रोखल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर, तैवान पुढच्या आठवड्यापासून आपल्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी युद्धसरावाचे आयोजन करणार आहे. सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, झिबेन, तैतूंग काऊंटी आणि झुवेई बंदरावजळ एकूण तीन टप्प्यांमध्ये हा युद्धसराव केला जाणार आहे. 8 व 9 मार्च रोजी सर्वात पहिला युद्धसराव झुवेई येथे होईल. तर झिबेन शहराच्या किनारपट्टीजवळ तैवानचे ॲम्फिबियस पथक 12 व 13 मार्च रोजी सरावात सहभागी होतील. तर महिनाअखेरीस स्वतंत्र युद्धसराव पार पडणार असल्याची माहिती तैवानी वृत्तसंस्थेने दिली.

दरम्यान, तैवानला कुठल्याही प्रकारचे लष्करी सहाय्य मिळू नये, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका तैवानला एफ-16 विमानांसाठी क्षेपणास्त्रांचा साठा पुरविणार होता. पण अमेरिकेने तैवानला लष्करी सहाय्य पुरविले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे. असे असले तरी तैवानच्या किनारपट्टीचा ताबा मिळविणे देखील चीनसाठी सोपी गोष्ट नसेल, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

leave a reply