अमेरिकच्या टेहळणी विमानामुळे तैवानच्या आखातातील शांतता धोक्यात

- चीनचा आरोप

तैवानच्या आखातातील शांतता

बीजिंग- अमेरिकेच्या पाणबुडीविरोधी टेहळणी विमानाने तैवानच्या आखातातून केलेला प्रवास या क्षेत्रातील शांतता धोक्यात आणणारा होता. अमेरिका जाणूनबुजून या क्षेत्रातील स्थैर्य संकटात आणत असल्याचा असा आरोप चीनने केला. रशिया-युक्रेनचे युद्ध, स्पाय बलून या मुद्यांवरुन अमेरिका आणि चीनमध्ये आधीच तणाव निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत, तैवानचा मुद्दा या तणावात भर टाकत असल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या सातव्या आरमारातील नौदलाच्या पी-8ए पोसायडन टेहळणी विमानाने सोमवारी तैवानच्या आखातातून प्रवास केला. तैवानच्या संरक्षणदलाने अमेरिकेच्या हवाई गस्तीची माहिती दिली. अमेरिकेने सदर हवाई गस्तीची कल्पना आपल्याला दिली होती, असे तैवानने सांगितले. पण तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनने यावर संताप व्यक्त केला. तसेच अमेरिकन विमानाची ही गस्त तैवानच्या आखातातील शांती व स्थैर्य धोक्यात आणत असल्याचा आरोप चीनने केला.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात चीनचे लढाऊ विमानाने अमेरिकेच्या टेहळणी विमानाजवळून धोकादायक प्रवास केला. तर चीनच्या विनाशिकेने अमेरिकन विमानाविरोधात क्षेपणास्त्र रोखण्याचा इशारा दिला होता.

leave a reply