चीनचा उल्लेख हटविणारा तैवानचा नवा पासपोर्ट

पासपोर्टतैपई – चीनपासून स्वतंत्र अस्तित्त्वासाठी आग्रही भूमिका कायम राखणार्‍या तैवानने आपल्या सार्वभौमत्त्वासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तैवानने आपल्या नागरिकांना देण्यात येणार्‍या पासपोर्टवरील ‘रिपब्लिक ऑफ चायना’ हा उल्लेख काढून टाकला आहे. सोमवारी तैवानने आपले नवे पासपोर्ट प्रसिद्ध केले असून त्यावर मोठ्या अक्षरात फक्त ‘तैवान’ असा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवानी व चिनी नागरिकांमध्ये गल्लत होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे तैवानकडून सांगण्यात आले.

leave a reply