इस्रायल-चीन संबंधात तणाव चीनने सिरियातील अस्साद राजवटीला लष्करी सहकार्य केले

Chinese and Syrian businessmen shake hands behind their national flags in Beijingतेल अविव – इस्रायल आणि चीनमधील सहकार्याला नुकतीच 30 वर्षे पूर्ण झाली. उभय देशांमधील व्यापार 18 अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून येत्या काळात यात वाढ होईल, अशी अपेक्षा इस्रायलने जानेवारी महिन्यात व्यक्त केली होती. पण इस्रायल चीनवरील विश्वास गमावत असल्याचे समोर येत आहे. चीनला होणारी इस्रायलची निर्यात घसरत चालल्याचा दावा केला जातो. तर सिरियातील संघर्षात चीन अस्साद राजवटीला लष्करी सहाय्य करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे इस्रायल आणि चीनमधील सहकार्य संकटात सापडल्याचा दावा इस्रायली विश्लेषकच करू लागले आहेत.

jinpingगेल्या महिन्यात सिरियन सरकारने राजधानी दमास्कसमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात परदेशी लष्करी सहाय्याची घोषणा केली होती. लवकरच सिरियन लष्कराला चीनकडून अतिप्रगत संपर्क यंत्रणा मिळणार असल्याचे सिरियन सरकारने जाहीर केले. याशिवाय चीन लवकरच सिरियन लष्करासाठी संरक्षण साहित्य पुरवू शकतो, असा दावा इस्रायली वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने केला. सिरियामध्ये तैनात रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियन लष्करासाठी निरुपयोगी ठरत आहेत. त्यामुळे सिरिया चीनकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करू शकतो, असे इस्रायली वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले.

China-extends-military-supportया बातमीमुळे इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. सिरियाला लष्करी सहाय्य पुरवून चीन इस्रायलविरोधी कारवाई करीत असल्याची टीका इस्रायलमधील लष्करी विश्लेषक करीत आहेत. सिरियातील चीनची ही गुंतवणूक इस्रायली लष्कराच्या सिरियातील दहशतवादी ठिकाणांवरील कारवाईत अडसर ठरू शकते, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर सिरियात व्यावसायिक गुंतवणूक करून चीन आपल्या लष्करी हालचाली लपवित असल्याचा आरोप इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख डॅनी याटोम यांनी केला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांममध्ये इस्रायल आणि चीनमधील परस्पर अविश्वास वाढत चालला आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत इस्रायलमधून चीनला होणारी निर्यात 15 टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर इस्रायलमधील सायबर हल्ल्यांमागे चीन असल्याचेही याआधी उघड झाले होते. या सर्व घडामोडींमुळे इस्रायल व चीनमधील संबंधात तणाव निर्माण झाल्याचे इस्रायली माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply