नायजरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ जवानांसह ८० जणांचा बळी

निआमे – आफ्रिकेतील साहेल क्षेत्राचा भाग असणार्‍या नायजरमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये ८० जणांचा बळी गेला आहे. बळींमध्ये नायजर लष्कराच्या ११ जवानांचा समावेश असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी ‘आयएस’संलग्न गटाने हल्ला चढविल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी एका स्वयंसेवी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या वर्षात नायजरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ५००हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

नायजरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ जवानांसह ८० जणांचा बळीमाली व बुर्किना फासो या देशांच्या सीमेला लागून असणार्‍या तिलाबेरी प्रांतात दहशतवादी हल्ले चढविण्यात आले. पहिला हल्ला ‘अदाब-दाब’ या गावात झाला. ‘बानिबान्गो’ शहरातील मेयर व त्यांचे शिष्टमंडळ प्रवास करीत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांच्या गटाने त्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात ६९ जणांचा बळी गेला असून १५ जण जखमी आहेत. या हल्ल्यानंतर नायजर सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. हल्ल्यामागे ‘इस्लामिक स्टेट इन ग्रेटर सहारा’ या दहशतवादी गटाचा हात असू शकतो, असे सुरक्षायंत्रणांनी सांगितले.

नायजरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ जवानांसह ८० जणांचा बळीदुसरा दहशतवादी हल्ला माली सीमेपासून जवळ असणार्‍या ‘दाग्ने’ गावात झाला. गावाच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या लष्करी पथकाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ११ जवानांचा बळी गेला असून काही जवान बेपत्ता आहेत. प्रतिहल्ल्यात काही दहशतवादीही ठार झाल्याची माहिती नायजर सरकारने दिली. या हल्ल्यामागेही ‘आयएस’ संलग्न गटाचा हात असल्याचे सांगण्यात येते. एकापाठोपाठ झालेल्या हल्ल्यानंतर तिलाबेरीमधील लष्करी तैनाती पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे.

आफ्रिकेतील नायजर, माली, बुर्किना फासो, चाड व मॉरिशानिया या देशांना ‘साहेल कंट्रीज्’ म्हणून ओळखले जाते. या साहेल क्षेत्रात गेल्या काही वर्षात दहशतवादी संघटनांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. नायजरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ जवानांसह ८० जणांचा बळी‘अल कायदा’ व ‘आयएस’ या दोन्ही संघटनांशी निगडित गट आपले वर्चस्व राखण्यासाठी सातत्याने हल्ले चढवित आहेत. अमेरिका व फ्रान्ससह युरोपिय देशांनी दहशतवादविरोधी मोहीम राबविली असली तरी त्याला अपेक्षित यश मिळाले नसून, दहशतवादी संघटना अधिक प्रबळ होत असल्याचे नव्या हल्ल्यांवरून दिसून येत आहे.

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या आफ्रिका क्षेत्रातील वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी, आफ्रिकेत दहशतवादाचा वणवा भडकल्याचा इशारा दिला होता.

leave a reply