‘टेस्ला’ पुढच्या वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार

नवी दिल्ली – टेस्ला कंपनी पुढच्या वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत टेस्ला मोटर्सचे प्रमुख एलोन मस्क यांनी दिले आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ करण्यासाठी सरकारकडून धोरण आखण्यात येत असताना टेस्ला कंपनीने भारतीय बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

'टेस्ला'

टेस्ला मोटर्सचे प्रमुख एलोन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. ‘इंडिया वॉन्ट टेस्ला’ असे लिहिलेला टी-शर्ट ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टला प्रतिसाद देताना एलोन मस्क यांनी निश्चितच पुढच्या वर्षी असे त्यांनी लिहले होते. प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद असेही मस्क यांनी म्हटले आहे.

सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि वापरास प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. २०३० पर्यंत देशात डिझेलवरील वाहनांची जागा इलेक्ट्रिक वाहने घेतील असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यात येत येत आहे. देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढल्यास इंधनावरील खर्च कमी होण्यास मदत मिळेल. यासह प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनी भारतीय बाजारात दाखल झाल्यास वाहनांच्या किमती कमी होण्यास मदत मिळेल, असे दावे करण्यात येत आहेत.

'टेस्ला'

टेस्लाने नुकतीच त्यांच्या चीन मध्ये बनवलेल्या ’मॉडेल – एस’ सेडानच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात ११ हजार वाहनांची विक्री केली आहे. तर आता कंपनीकडून नवीन मॉडेल्सच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्यावर्षीपासून कंपनीच्या समभागात ४९५ टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीचे बाजारमूल्य ४०० अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

leave a reply