इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला त्वरीत शस्त्रसज्ज करावे

- अमेरिकेतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे आवाहन

वॉशिंग्टन – ‘इराण याआधी कधीही नव्हता इतका अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचला आहे. यामुळे आखातात संकट उभे राहिले आहे. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखायचे असेल तर अमेरिकेने इस्रायलला त्वरित आवश्यक त्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करावा. कारण एकटा इस्रायलच इराणला अणुबॉम्बनिर्मितीपासून रोखू शकतो’, असे आवाहन अमेरिकेच्या लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या गटाने केला.

इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला त्वरीत शस्त्रसज्ज करावे - अमेरिकेतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे आवाहनइराण अणुबॉम्बनिर्मितीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. यासाठी आवश्यक युरेनियमचे संवर्धन व सेंट्रिफ्यूजेसचा साठा इराणने जमा केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिली होती. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमावर चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या ‘ज्युईश इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी ऑफ अमेरिका-जेआयएनएसए’ या गटाने अमेरिकन काँग्रेसला पत्राद्वारे आवाहन केले आहे. यामध्ये जनरल आणि ॲडमिरल पदावरून निवृत्त झालेल्या ४४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बायडेन प्रशासनाने इस्रायलसाठी राखून ठेवलेला शस्त्रसाठा युक्रेनसाठी वळविल्याची बातमी काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. बायडेन प्रशासन अजूनही इराणच्या अणुकार्यक्रमाचा प्रश्न राजनैतिक वाटाघाटीद्वारे सोडविण्यावर ठाम आहे. अमेरिकेच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लष्करी अधिकारी म्हणून आम्हालाही इराणच्या अणुकार्यक्रमाचा प्रश्न राजनैतिक चर्चेतून सुटावा असे वाटत आहे. पण इराणबरोबर अशा स्वरुपाचा करार होऊन ही समस्या सुटण्याची शक्यता सध्या तरी दृष्टीपथात नाही, याकडे या माजी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखायचे असेल, तर इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरविण्यावाचून पर्याय नसल्याचे ‘जेआयएनएसए’च्या पत्रात म्हटले आहे.

यासाठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचाच दाखला दिला. ‘एक वर्षापासून युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध भडकल्यानंतर युक्रेनला शस्त्रसज्ज करणे सुरू आहे. हे टाळायचे असेल आणि आखातातील मित्रदेशांची सुरक्षा हवी असेल या क्षेत्रात संघर्ष भडकण्याआधीच इस्रायलला शस्त्रसज्ज करणे योग्य ठरेल’, असे या पत्रातून माजी लष्करी अधिकाऱ्यांनी बायडेन प्रशासनाला सुचविले. अमेरिका युक्रेनला ज्याप्रमाणे शस्त्रास्त्रे पुरवित आहे, इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला त्वरीत शस्त्रसज्ज करावे - अमेरिकेतील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे आवाहनअगदी त्याचप्रमाणे पण संघर्ष भडकण्याआधी इस्रायलला शस्त्रास्त्रे पुरविली जावी, असे निवृत्त वाईस ॲडमिरल हर्मन शेलांस्की यांनी इस्रायली दैनिकाशी बोलताना स्पष्ट केले.

अमेरिकेने इस्रायलला इंधनवाहू ‘केसी-४६ पेगासस’ टँकर विमान, मॅकडॉनल डग्लस एफ-१५ इगल, लॉकहिड मार्टीनचे एफ-३५ लाईटनिंग टू लढाऊ विमानांची विक्री करावी. त्याचबरोबर अचूक लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही पुरवठा अमेरिकेने इस्रायलला करावा, अशी यादी या पत्रात दिली आहे. ‘‘अण्वस्त्रसज्ज इराणपासून आपल्या देशाच्या आणि हितसंबंधांच्या सुरक्षेला धोका आहे, हे अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना ठाऊक आहे. इराणचा हा आण्विक धोका रोखण्याची आणि उत्तर देण्याची क्षमता इस्रायलमध्ये आहे. म्हणूनच ‘जेआयएनएसए’ने हे पत्र अमेरिकन काँग्रेसकडे सुपूर्द केले आहे. यामुळे काँग्रेसमधील डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन जागे होतील आणि इस्रायलला शस्त्रसज्ज करण्याचा निर्णय घेतील’’, अशी अपेक्षा जेआयएनएसएचे अध्यक्ष आणि माजी लष्करी अधिकारी मिशेल मॅकोव्हस्की यांनी व्यक्त केली. दरम्यान, अणुऊर्जा आयोगाच्या इशाऱ्यानंतरही बायडेन प्रशासन इराणबरोबर वाटाघाटी करून अणुकराराच्या माध्यमातून हा वाद मिटविण्यावर ठाम आहे. पण अमेरिकेतील लष्करी अधिकारी याच्या विरोधात असल्याचे या पत्रातून उघड होत आहे.

हिंदी English

 

leave a reply