युएईने १.३६ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची खरेदी केली

अबू धाबी – अबूधाबीमध्ये सुरू असलेल्या जगप्रसिद्ध ‘इंटरनॅशनल डिफेन्स एक्झिबिशन अँड कॉन्फरन्स’मध्ये (आयडीईएक्स) आयोजक युएईने १.३६ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटात देखील यंदाच्या आयोजनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याच युएईने म्हटले आहे.

यंदाच्या ‘आयडीईएक्स’मध्ये वेगवेगळ्या देशातील ९०० कंपन्यांनी आपल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडले होते. आखातातील सर्वात मोठ्या या शस्त्रप्रदर्शनात चिलखती वाहनांपासून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना सर्वाधिक मागणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते. या प्रदर्शनात अमेरिकेच्या लॉकहिड मार्टिन या कंपनीने देखील आपले दालन मांडले आहे. पण अमेरिकी कंपन्यांचा प्रतिसाद काहीसा थंडावलेला असल्याचा दावा केला जातो.

या व्यतिरिक्त चीनचे ‘फायर ड्रॅगन’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचे दालन आहे. रशियाच्या चेचेन प्रांताचे नेते रमझान कॅडिरोव्ह यांनी कॅलेशनिकोव्ह रायफल्सच्या दालनाला भेट दिली.

leave a reply