चीन ने तैवानवर हल्ला चढविल्यास अमेरिकेने फिलिपाईन्सचे तळ वापरावे

- अमेरिकेतील फिलिपाईन्सचे राजदूत

तैवानवर हल्लावॉशिंग्टन – चीनने तैवानवर हल्ला चढविल्यानंतर फिलिपाईन्सची सुरक्षा धोक्यात येईल. तशा परिस्थितीत अमेरिकेने बिनदिक्कतपणे फिलिपाईन्सच्या लष्करी तळांचा वापर करावा, असा प्रस्ताव फिलिपाईन्सचे राजदूत जोस मॅन्यूअल रोमाल्देझ यांनी दिला आहे. चीनबरोबरच्या तणावात अमेरिका, जपान, ऑस्ेलियासारखे देश तैवानच्या बाजूने उभे राहत आहेत. अशावेळी फिलिपाईन्सने केलेली ही घोषणा चीनला आव्हान देणारी ठरते.

युक्रेन युद्ध आणि तैवानला चीनपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्सला अमेरिकेबरोबर संबंध अधिक भक्कम करायचे आहेत, असे राजदूत रोमाल्देझ म्हणाले. अमेरिका व फिलिपाईन्समधील संरक्षण करार या सहकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे रोमाल्देझ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेची आग्नेय आशियातील भूमिका अधिक व्यापक बनल्याचा दावा फिलिपाईन्सच्या राजदूतांनी केला.

दरम्यान, राजदूत रोमाल्देझ हे फिलिपाईन्सचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांच्या परिवारातील सदस्य म्हणून ओळखले जातात. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्या राजकीय वर्तुळात रोमाल्देझ यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे अमेरिकेतील फिलिपाईन्सच्या राजदूतांनी तैवानवरील हल्ला आणि अमेरिकेला लष्करी तळ वापरण्याबाबत केलेल्या विधानांना फार मोठे महत्त्व असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

leave a reply