अमेरिका-जपानचा पाणबुडीविरोधी सराव

टोकिओ – अमेरिका आणि जपानच्या विनाशिकांनी साऊथ चायना सीच्या क्षेत्रात पाणबुडीविरोधी युद्धसराव केला. याआधी अमेरिका-जपानच्या विनाशिकांनी ‘सी ऑफ जपान’च्या क्षेत्रात या सरावाचे आयोजन केले होते. पण पहिल्यांदाच अमेरिका-जपानच्या नौदलाने साऊथ चायना सीमध्ये हा सराव आयोजित केला आहे.

अमेरिका-जपानचा पाणबुडीविरोधी सरावअमेरिकेची ‘युएसएस मायलस’ विनाशिका तसेच दोन गस्तीनौका या सरावात सहभागी झाल्या होत्या. तर जपानच्या नौदलातील ‘कागा’ या हेलिकॉप्टरवाहक युद्धनौकेने अमेरिकेच्या विनाशिकेला साथ दिली. या सरावात सहभागी झालेल्या पाणबुड्यांचे तपशील उघड केलेले नाहीत. पण जपानच्या नौदलातील अतिप्रगत पाणबुड्यांनी यात सहभाग घेतल्याचा दावा केला जातो.

येत्या काळात सागरी संघर्ष पेटलाच तर शत्रूच्या पाणबुड्यांना कसे प्रत्युत्तर द्यायचे, यासंबंधीचा सराव यावेळी पार पडला. या सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या नौदलाच्या सामर्थ्याची चाचणी घेण्यात आली. तसेच स्वतंत्र आणि मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षा व स्थैर्यासाठी हा सराव आवश्यक असल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकार्‍याने जाहीर केले.

leave a reply