तैवानवरील चीनच्या हल्ल्यांबाबत अमेरिकेने चार शक्यता वर्तविल्या

biden tsaiवॉशिंग्टन/बीजिंग – गेल्या काही महिन्यांपासून चीनने तैवानच्या आखातात प्रक्षोभक आणि अस्थैर्य निर्माण करणाऱ्या लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. हा तैवानचा कब्जा घेण्यासाठी चीनच्या प्रयत्नांचा भाग ठरतो. तैवानची हवाई-सागरी कोंडी, मर्यादित किंवा आक्रमक लष्करी कारवाया, हवाई हल्ले; अथवा तैवानमध्ये लष्कर घुसवून संपूर्ण युद्ध पुकारण्यासारख्या चार शक्यता मांडून, यापैकी एका पर्यायाचा वापर करून चीन तैवानचा ताबा घेऊ शकतो, असा इशारा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिला आहे.

चीनकडून तैवानवरील हल्ल्याची शक्यता वाढत चालली आहे. येत्या काही वर्षातच चीन तैवानवर हल्ला चढविल, असे चीनमधील ५६.७ टक्के तर जपानमधील ४४.५ टक्के जनतेला वाटत आहे. जपानमधील अभ्यासगट आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर ही शक्यता बळावल्याचे चीनचे म्हणणे आहे.

jinpingमात्र तैवानवरील हल्ल्यासाठी चीन कारणे शोधत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. चीनवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तैवानच्या विलिनीकरणाची प्रक्रिया जलद करतील, असे अमेरिकन विश्लेषकांनी याआधी म्हटले होते. पण पेंटॅगॉनने तयार केलेल्या ‘चायना मिलिटरी पॉवर रिपोर्ट-सीएमपीआर’ वार्षिक अहवालात चीन २०४९ सालापर्यंत तैवानचा ताबा घेऊ शकतो, असा दावा केला. यासाठी चीन वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करू शकतो, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.

दरम्यान, तैवानला शस्त्रसज्ज करण्यासाठी अमेरिका १० अब्ज डाचलर्सचे सहाय्य करणार असल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तसंस्थेने केला. चीनबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानला शस्त्रसज्ज करण्याला बायडेन प्रशासन महत्त्व देत आहे. त्याचबरोबर तैवानच्या आखाताजवळ अमेरिकेने आपल्या युद्धनौका व विनाशिकांची गस्त वाढविल्याच्या बातम्याही येत आहेत. अमेरिकन नौदलाची ही गस्त प्रक्षोभक असल्याचा आरोप चीनने केला होता.

हिंदी

leave a reply