अमेरिका-सौदीमध्ये पहिला ड्रोनविरोधी युद्धसराव संपन्न

रियाध – अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या लष्करातील पहिला ड्रोनविरोधी ‘रेड सँड्स’ युद्धसराव नुकताच संपन्न झाला. राजधानी रियाध येथे आयोजित करण्यात आलेला हा सराव दोन्ही देशांमधील आगामी सरावांची सुरुवात होती, असा दावा केला जातो. सौदी व इराणमध्ये सहकार्य प्रस्थापित होणार असल्याच्या बातम्या येत असताना सदर युद्धसराव लक्षवेधी ठरतो.

अमेरिका-सौदीमध्ये पहिला ड्रोनविरोधी युद्धसराव संपन्नअमेरिका व सौदीतील या युद्धसरावाला मोठी प्रसिद्धी देण्यात आली नव्हती. या सरावाची रुपरेषा गोपनीय ठेवण्यासाठी तसे करण्यात आले होते. पण गेल्या आठवड्यात हा सराव पार पडल्यानंतर अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’ने सदर सरावाची माहिती उघड केली. या ड्रोनविरोधी सरावामुळे अमेरिका व सौदीच्या लष्कराला मोठे सहाय्य मिळणार असल्याचा दावा सेंटकॉमने केला. सिरिया तसेच युक्रेनमधील युद्धात इराणनिर्मित ड्रोन्सचा वापर सुरू असल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सौदीसह या सरावाचे आयोजन करून इराणला इशारा दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सौदीप्रमाणे आखातातील इतर देशांबरोबरही अशा प्रकारच्या युद्धसरावांचे आयोजन करण्यावर अमेरिका विचार करीत आहे.

हिंदी English

 

leave a reply