अमेरिका, तैवानच्या नेत्यांमधील चर्चेचे गंभीर परिणाम होतील

- चीनचा अमेरिकेला इशारा

बीजिंग – लॅटीन अमेरिकी देशांच्या भेटीवर निघालेल्या तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन पुढच्या आठवड्यात अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅकार्थी यांची भेट घेणार आहेत. पण त्याआधीच अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेला धमकावले. अमेरिकेच्या नेत्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.

‘एससीओ’मध्ये सहभागी होण्यास सौदी अरेबियाची मान्यतादोन दिवसांपूर्वीच चीनने होंडूरास या लॅटीन अमेरिकी देशाला तैवानबरोबरच्या सहकार्यापासून तोडले. होंडूरासला कर्जाच्या विळख्यात खेचून चीनने तैवानला एकटे पाडण्यासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे सध्या तैवानला देश म्हणून मान्यता देणारे एकूण १२ देशच शिल्लक राहिले आहेत. यामध्ये ग्वातेमाला आणि बेलीझ या लॅटीन अमेरिकी देशांचा समावेश आहे. या देशांबरोबरील व्यापारी सहकार्य वाढविण्यासाठी बुधवारी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा आपल्या दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाल्या.

गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षा ग्वातेमाला आणि बेलीझ या देशांना भेट देतील. तैवानसाठी रवाना होण्याआधी ५ एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्षा त्साई पुन्हा एकदा अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात दाखल होतील. ‘एससीओ’मध्ये सहभागी होण्यास सौदी अरेबियाची मान्यतायावेळी अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाचे सभापती मॅकार्थी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. चीनचा धोका, तैवानबरोबरचे सहकार्य या मुद्यांवर मॅकार्थी व राष्ट्राध्यक्षा त्साई यांच्यात चर्चा अपेक्षित होती. पण तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे चीनची बेचैनी वाढली आहे.

अमेरिकेच्या कोणत्याही नेत्याने तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना भेट देऊ नये, कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये आणि तैवानच्या स्वातंत्र्याला समर्थन देणारे कोणतेही विधान अमेरिकेच्या नेत्यांनी करू नये, अशी मागणी चीनने केली आहे. यानंतरही अमेरिकेच्या नेत्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. तर त्याचे गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. दरम्यान, तैवानच्या सुरक्षेची वचनबद्धता घेणाऱ्या अमेरिकेने यावर चीनला प्रत्युत्तर दिलेले नाही.

हिंदी

 

leave a reply