जर्मनी, बेल्जिअममधील महापुरात 120 जणांचा बळी

बर्लिन – मध्य युरोपमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर रिने नदीला आलेला महापूर यामध्ये 120 जणांचा बळी गेला. तर शेकडो जण बेपत्ता आहे. जर्मनी व बेल्जिअम या युरोपिय देशांमधून वाहणार्‍या या नदीच्या प्रवाहात बरीचशी घरे वाहून गेल्याच्या बातम्या येत आहेत. 2016 सालच्या पूरापेक्षा यंदाची आपत्ती सर्वात भयानक होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्य युरोपिय देशांना पावसाने झोडून काढले आहे. रिने नदीच्या क्षेत्रात पावसाने जोर धरल्यामुळे नॉर्थ रिने-वेस्टफालिया आनि रिनेलँड पॅलेटिनेट या दोन भागांना जबरदस्त फटका बसला आहे. एकट्या रिनेलँड पॅलेटिनेट भागात 63 जणांचे मृतदेह आढळले. तर रिने-वेस्टफालियामधील महापुरात 43 जणांचा बळी गेला. येथील एका वृद्धाश्रमावर या महापूराने झडप घातल्याची माहिती समोर येत आहे.

जर्मनी, बेल्जिअममधील महापुरात 120 जणांचा बळीजर्मनीतील बळींची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता वर्तविली जाते. शेकडो जण बेपत्ता असल्याचा दावा स्थानिक यंत्रणा करीत आहेत. तर हजारो जण बेघर झाले आहेत. बचाव आणि शोधमोहिमेसाठी जर्मन यंत्रणांनी 15 हजार जवान, पोलीस व आपत्कालिन अधिकार्‍यांना तैनात केले आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी या आपत्तीत बळी गेलेल्यांवर शोक व्यक्त केला.

जर्मनी, बेल्जिअममधील महापुरात 120 जणांचा बळीयाआधी 2016 साली जर्मनीला पुराचा फटका बसला होता. यामध्ये 21 जणांचा बळी गेला होता. तसेच पाच वर्षांपूर्वीच्या आपत्तीची तीव्रताही कमी होती. पण यंदा रिने नदीला आलेला महापूर अतिशय भयानक होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

बेल्जिअममधील महापूरात 20 जणांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. तर नेदरलँड, लक्झम्बर्ग, स्वित्झर्लंड देखील या महापूराने प्रभावित झाले आहेत. नेदरलँडच्या मूझ नदीला देखील पूर आला असून स्थानिकांना तातडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

leave a reply