अफगाणिस्तानात लष्कराच्या कारवाईत 190 तालिबानी ठार

- तालिबानच्या कैदेतून आठ जवानांची सुटका

काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानच्या लष्कराने केलेल्या कारवाईत 190 तालिबानी ठार झाल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तालिबानने देखील तीन जिल्ह्यांचा ताबा मिळविल्याच्या बातम्या चिनी माध्यमांमधून दिल्या जात आहेत. त्याचवेळी अमेरिकेने तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत. पण बराच काळ याचे तपशील समोर आले नव्हते.

अफगाणिस्तानात लष्कराच्या कारवाईत 190 तालिबानी ठार - तालिबानच्या कैदेतून आठ जवानांची सुटकाअफगाणी लष्कराने रविवारपासून ते सोमवार सकाळपर्यंत 14 प्रांतांमध्ये कारवाई केली. राजधानी काबुलसह कंदहार, हेल्मंड, नांगरहार, झाबूल, हेरात, बदघीस, बल्ख, फरयाब, जोवझान, सिर-ए पोल, बघलान आणि कापिसा या प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत 140 तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले. एकट्या लघमान प्रांतात केलेल्या कारवाईत 50 तालिबानी दहशतवाद्यांचा खातमा केला. लघमान प्रांतात अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये मोठा संघर्ष पेटला होता.

अफगाणिस्तानात लष्कराच्या कारवाईत 190 तालिबानी ठार - तालिबानच्या कैदेतून आठ जवानांची सुटकादोन दिवसांपूर्वी लघमान प्रांतातच तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात 10 जणांचा बळी गेला होता. यामध्ये अफगाणी सुरक्षा जवानांबरोबर स्थानिकांचाही समावेश होता. यामुळे अफगाणी लष्कराने लघमान प्रांतात मोठी मोहीम छेडली होती. याशिवाय रविवारी रात्री बघलान प्रांतातील कारवाईत अमरख्ली गावात तालिबानींनी अपहरण केलेल्या आठ जवानांची सुरक्षित सुटका केल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. या चोवीस तासांच्या कारवाईत सव्वाशेहून अधिक दहशतवादी जखमी झाले.

अफगाणिस्तानात लष्कराच्या कारवाईत 190 तालिबानी ठार - तालिबानच्या कैदेतून आठ जवानांची सुटकाफरयाब येथील कारवाईत महिला आत्मघाती दहशतवाद्याला ठार केल्याची माहिती अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली. तालिबानने देखील अफगाणी लष्करावरील हल्ले वाढविल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रविवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी वरदाक प्रांतातील जलरीझ, लघमान प्रांतातील दौलत शहा या जिल्ह्यांचा ताबा घेतला. तालिबानच्या आक्रमणासमोर काही ठिकाणी अफगाणी लष्कराला माघार घ्यावी लागल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबानविरोधी संघर्षात आपली जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा दाखविल्यामुळे सुमारे 100 जवानांना अटक केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून दिली जात आहे.

तालिबानवरील या कारवाईत अफगाणी लष्कराला अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचे सहाय्य मिळत असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. सोमवारी तालिबानच्या ठिकाणांवर अमेरिकेने हवाई हल्ले चढविल्याचे समोर येत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील कारवाईसाठी पाकिस्तानने अमेरिकेला हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी दिल्याची माहिती पेंटॅगॉनच्या अधिकार्‍याने काही तासांपूर्वीच दिली होती. पाकिस्तानात याची चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.

leave a reply