बुर्किना फासोतील भीषण दहशतवादी हल्ल्यात 33 जणांचा बळी

बुर्किना फासो – आफ्रिकेच्या खनिजसंपन्न देशांपैकी एक असलेल्या बुर्किना फासोत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 33 जणांचा बळी गेला. देशाच्या पश्चिम भागात ही घटना घडली असून दहशतवाद्यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकरी तसेच मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्याभरात बुर्किना फासोत झालेला हा चौथा मोठा दहशतवादी हल्ला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 60 जणांचा बळी गेला होता.

बुर्किना फासोतील भीषण दहशतवादी हल्ल्यात 33 जणांचा बळीबौकल दे मोहोन प्रांतात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती स्थानिक गव्हर्नरनी दिली. संध्याकाळच्या सुमारास गाड्यांमधून आलेल्या दहशतवाद्यांनी योलू गावातील शेतात हल्ला चढविला. यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह 33 जणांचा बळी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. बुर्किना फासोच्या सीमेला जोडून असलेल्या मालीतील दहशतवादी गटांनी सदर हल्ला चढविला असावा, असे सांगण्यात येते.

बुर्किना फासोतील लष्कराच्या ताब्यात असलेल्या सरकारने गेल्याच आठवड्यात अल कायदा आणि आयएसविरोधात मोठ्या कारवाईची घोषणा केली होती. बुर्किना फासोतील भीषण दहशतवादी हल्ल्यात 33 जणांचा बळीसाहेल प्रांतातील देशांच्या सीमेवर ही कारवाई सुरू करण्याचे संकेत बुर्किना फासोच्या लष्कराने दिले होते. पण त्याआधीच दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ हल्ले चढविण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

आफ्रिकेतील खनिजसंपन्न देशांपैकी एक असलेला बुर्किना फासो गेल्या वर्षी एकापाठोपाठ झालेल्या दोन लष्करी बंडांमुळे चर्चेत आला होता. या बंडानंतर सत्ता हाती घेतलेल्या लष्कराने देशातील फ्रेंच लष्करी तुकड्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर देशात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्याचे समोर येत आहे.

हिंदी

 

leave a reply