आशियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व रशियामधील लष्करी सहकार्य वाढते आहे

- जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

स्टॉकहोम/टोकिओ – एका बाजूला चीन ईस्ट व साऊथ चायना सीमधील ‘जैसे थे’ स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी कारवाया करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला आशियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व रशियामध्ये लष्करी सहकार्य वाढते आहे, असा इशारा जपानचे परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांनी दिला. या वाढत्या सहकार्याला रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोप खंडातील बदलत्या स्थितीची पार्श्वभूमी असल्याचेही जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

आशियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व रशियामधील लष्करी सहकार्य वाढते आहे - जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारायुरोपच्या स्वीडनमध्ये ‘ईयू इंडो-पॅसिफिक मिनिस्टेरिअल फोरम’ची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आपली भूमिका मांडताना जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीन व रशियाच्या वाढत्या सहकार्याचा धोका अधोरेखित केला. ‘रशिया-युक्रेन युद्धानंतर युरोप व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या स्थितीत फारसा फरक राहिलेला नाही. रशियाच्या युक्रेनमधील हल्ल्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या पायालाच हादरे बसले आहेत. या हादऱ्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रितरित्या प्रतिसाद द्यायला हवा’, असे आवाहन परराष्ट्रमंत्री हयाशी यांनी केले.

जर एकत्र येऊन प्रतिसाद दिला नाही तर रशिया-युक्रेनप्रमाणेच जगाच्या इतर भागांमध्येही नवी आव्हाने समोर येतील आणि शांतता व समृद्धीचा समावेश असलेल्या सध्याच्या व्यवस्थेलाच उलथून टाकतील, याकडे जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर हयाशी यांनी चीनकडून आशिया व इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरू असलेल्या एकतर्फी कारवायांचा उल्लेख केला. आशियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व रशियामधील लष्करी सहकार्य वाढते आहे - जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशाराया कारवाया सुरू असताना याच क्षेत्रात चीन व रशिया लष्करी सहकार्य वाढवित असल्याची जाणीव जपानच्या मंत्र्यांनी करून दिली.

गेल्या काही वर्षात चीन व रशियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील संरक्षण सरावांची संख्या वाढविली असून त्यात हवाई तसेच नौदल सरावांचा समावेश आहे. या सरावांमुळे सदर क्षेत्रात दोन्ही देशांच्या युद्धनौका तसेच लढाऊ विमानांचा वावर वाढला असल्याचे हयाशी यांनी बजावले. या दोन देशांबरोबर उत्तर कोरियाकडून सुरू असणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या अधिकच चिथावणी देणाऱ्या असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

आशियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन व रशियामधील लष्करी सहकार्य वाढते आहे - जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारारशिया-युक्रेन युद्धात जपानने युक्रेनला समर्थन दिले असून चीन रशियाला सहकार्य करीत असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी जपानचे पंतप्रधान युक्रेनला भेट देत असतानच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशिया दौऱ्यावर होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया व चीनमधील सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यात व्यापार तसेच संरक्षण क्षेत्राचा समावेश आहे. यावरून पाश्चिमात्य देशांनी चीनला समज दिली असली तरी चीनने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फायदा उचलून चीन तैवानवर हल्ला करेल, असे इशारे पाश्चिमात्य विश्लेषक व अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.

हिंदी

 

leave a reply