नायजेरियातील हिंसाचारात सुमारे ५० जणांचा बळी

अबुजा – नायजेरियाची राजधानी अबुजाजवळ असणार्‍या कादुना प्रांतातील हिंसाचारात सुमारे ५० जणांचा बळी गेला आहे. बळींमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक सुरक्षायंत्रणांनी दिली. हिंसाचारामागे दरोडेखोरांचा गट किंवा दहशतवादी संघटनेचा हात असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘बोको हराम’ व ‘आयएस’सारख्या गटांनी आपला विस्तार वाढविण्यासाठी दरोडेखोर व गुन्हेगारी टोळ्यांचे सहाय्य घेतल्याचे समोर आले आहे.

नायजेरियातील हिंसाचारात सुमारे ५० जणांचा बळीउत्तर नायजेरियातील अस्थिर प्रांतांपैकी एक म्हणून कादुना ओळखण्यात येतो. गेल्या काही महिन्यात उत्तरेकडील बहुतांश प्रांतांमध्ये अपहरण, दहशतवादी हल्ले व वांशिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून कादुनातील घटनाही त्याचाच भाग दिसत आहे. हल्लेखोरांनी इदासु भागातील तीन गावांवर जोरदार हल्ले चढविले. यात कौरन फवा, मार्के व रिहेया यांचा समावेश आहे.

पहिला हल्ला गेल्या आठवड्यात शुक्रवारी चढविण्यात आला. त्यात नऊजणांचा बळी गेला. त्यानंतर शनिवारी व रविवारी पुन्हा हल्ले चढविण्यात आले. नायजेरियातील हिंसाचारात सुमारे ५० जणांचा बळीया हल्ल्यांमध्ये ३८ जणांचा बळी गेला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे बळींची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. हल्ल्यादरम्यान अनेक घरे, मालमत्ता तसेच शेतांची जाळपोळ करण्यात आली आहे.

हल्ल्यानंतर या भागात लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या असून शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांनी हल्ल्यांमध्ये बळी गेलेल्यांप्रती शोक व्यक्त करून कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांसह सरकारकडून देण्यात येणार्‍या आश्‍वासनांवर स्थानिक जनता नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नायजेरियातील हिंसाचारात सुमारे ५० जणांचा बळीया वर्षाच्या सुरुवातीला मार्च व एप्रिल महिन्यात कादुनामधील शिक्षणसंस्थांवर हल्ले चढवून विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर काही काळासाठी सुरक्षाव्यवस्था वाढविण्यातही आली होती.

पण दहशतवादी गट तसेच दरोडेखोरांच्या टोळ्या सुरक्षायंत्रणांना मात देऊन हल्ले चढवित असल्याचे समोर आले आहे. कादुनासह नायजेरियाच्या इतर प्रांतांमध्ये अल कायदा, आयएस संलग्न दहशतवादी संघटनांबरोबर छोट्यामोठ्या स्थानिक टोळ्या आहेत. यामध्ये गुरढोरांची लूट करणार्‍या टोळ्यांचा देखील समावेश आहे. नायजेरियाचे सरकार दहशतवादी संघटना तसेच स्थानिक टोळ्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जातो.

leave a reply