सुदानचे लष्कर व निमलष्करी दलात पेटलेल्या संघर्षात 56 जणांचा बळी

- राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानावर ताबा घेतल्याचा निमलष्करी दलाचा दावा - खार्तुम विमानतळावरील हल्ल्यात सौदीच्या विमानावर गोळीबार

खार्तुम – सुदानमध्ये लोकशाही व्यवस्था लागू करण्यावरुन लष्कर आणि निमलष्करीदलामध्ये सुरू असलेल्या वादाचे रुपांतर संघर्षात झाले. शनिवारी राजधानी खार्तूमसह सुदानच्या इतर प्रमुख शहरांमध्ये लष्कर व निमलष्करी दलातील संघर्षात किमान 56 जणांचा बळी गेला असून 600हून अधिक जखमी झाले आहेत. देशातील राष्ट्राध्यक्षीय निवासस्थान तसेच विमानतळांचा ताबा घेतल्याचा दावा निमलष्करी दलाने केला. खार्तुमच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्यात सौदी अरेबियाचे विमान जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अमेरिका, भारत, ब्रिटन, युएई आणि संयुक्त राष्ट्रसंघाने सुदानमधील दोन्ही गटांना संघर्षबंदीचे आवाहन केले आहे.

सुदानचे लष्कर व निमलष्करी दलात पेटलेल्या संघर्षात 56 जणांचा बळी - राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानावर ताबा घेतल्याचा निमलष्करी दलाचा दावा - खार्तुम विमानतळावरील हल्ल्यात सौदीच्या विमानावर गोळीबार2021 साली सुदानच्या लष्कराने बंड करीत हुकूमशहा ओमर अल-बशीर यांची राजवट उलथविली होती. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांच्या नेतृत्वाखालील ‘सॉव्हरीन कौन्सिल’ सुदानमधील राजकीय व्यवस्था हाताळत होते. पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरुन वाढत्या दबावामुळे लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी देशात लोकशाही व्यवस्था लागू करण्याचे संकेत दिले होते. पुढील दोन वर्षात सुदानमध्ये लोकशाही सरकार सत्तेवर असेल, अशी घोषणा लष्कराने केली होती.

लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी संरक्षणदलाची संपूर्ण सूत्रे हाती घेण्याचेही स्पष्ट केले होते. पण ‘सॉव्हरीन कौन्सिल’ चे उपाध्यक्ष आणि निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डागालो यांनी या सत्तांतरणाच्या प्रस्तावाला विरोध केला. किमान 10 वर्षांसाठी देशात लोकशाही व्यवस्था लागू करण्याची योजना पुढे ढकलावी, अशी मागणी जनरल डागालो यांनी केली होती. सुदानचे लष्कर व निमलष्करी दलात पेटलेल्या संघर्षात 56 जणांचा बळी - राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानावर ताबा घेतल्याचा निमलष्करी दलाचा दावा - खार्तुम विमानतळावरील हल्ल्यात सौदीच्या विमानावर गोळीबारयावरुन लष्कर आणि निमलष्करी दलात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. जनरल बुरहान याबाबत जनरल डागालो यांची भेट घेऊन चर्चा करणार होते.

पण त्याआधीच निमलष्करी दलाने मेरोवे येथील लष्कराच्या तळाजवळ आपला स्वतंत्र तळ उभा केला. यामुळे दोन्ही दलांमधील वादाचे रुपांतर संघर्षात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. शनिवारी सकाळी जनरल डागालो यांच्या नेतृत्वाखाली निमलष्करी दलाने लष्कराशी बंड करुन राजधानी खार्तुम, ओमदूरमान आणि इतर शहरांमधील लष्कराच्या तळांवर हल्ले केले. राजधानीतील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान तसेच खार्तुम आंतरराष्ट्रीय विमानतळ व देशातील इतर प्रमुख ठिकाणांचा ताबा घेतल्याचा दावा निमलष्करी दलाने केला. यामध्ये अनेकांचा बळी गेला असून त्यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे.

सुदानचे लष्कर व निमलष्करी दलात पेटलेल्या संघर्षात 56 जणांचा बळी - राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानावर ताबा घेतल्याचा निमलष्करी दलाचा दावा - खार्तुम विमानतळावरील हल्ल्यात सौदीच्या विमानावर गोळीबारसुदानच्या संरक्षणदलांमधील या संघर्षाची झळ सौदी अरेबियाला देखील बसली आहे. येथील खार्तुम विमानतळावर सौदीचे प्रवासी विमान उड्डाणासाठी तयार होते. सौदीचे प्रवासी विमानात बसून मायदेशी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच विमानतळावर जोरदार गोळीबार झाला. यामध्ये सौदीच्या विमानाचे जबर नुकसान झाले. तर विमानातील प्रवासी व कर्मचाऱ्यांना सौदीच्या दूतावासात आणण्यात आले आहे. सुदानचा शेजारी देश चाडने आपली सीमारेषा बंद केली आहे.

दरम्यान, सुदानमधील आपल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. पुढील सुचना येईस्तोवर घरातच सुरक्षित रहावे, असे आवाहन भारताने सुदानमधील आपल्या नागरिकांना केले आहे. अमेरिका, ब्रिटन, युएई व संयुक्त राष्ट्रसंघाने सुदानमधील या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. तसेच सुदानमधील दोन्ही गटांनी संघर्षबंदी लागू करावी, असे आवाहन या देशांनी केले आहे.

हिंदी English

 

leave a reply