रशियाकडून मोल्दोव्हातील राजवट उलथण्याचा कट

मोल्दोव्हाच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप

Moldovaचिसिनाव/मॉस्को/किव्ह – रशियासह इतर परदेशी एजंटस्‌‍च्या सहाय्याने मोल्दोव्हातील सत्ताधारी राजवट उलथण्याचा कट आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप मोल्दोव्हाच्या राष्ट्राध्यक्ष माया सॅन्डू यांनी केला. या कटाअंतर्गत रशियासह बेलारुस, सर्बिया व माँटेनेग्रोचे नागरिक असलेले एजंट मोल्दोव्हात घुसून अशांतता व अस्थैर्य निर्माण करणार असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष सॅन्डू यांनी केला. मोल्दोव्हन राष्ट्राध्यक्षांचे आरोप रशियाने फेटाळून लावले असून ते तथ्यहीन असल्याची प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र विभागाने दिली.

regime in Moldovaयुक्रेन व रोमानिया या दोन देशांच्या सीमांशी जोडलेला मोल्दोव्हा हा एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग होता. १९९१ साली रशियन संघराज्याचे विभाजन झाल्यानंतर या देशाने स्वातंत्र्याची घोषणा केली. मात्र यातील ट्रान्सनिस्ट्रिआ हा प्रांत स्वायत्त असून यात रशियासमर्थक गटाचे सरकार आहे. सुमारे २६ लाख लोकसंख्येच्या या देशाने युरोपिय महासंघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला असून महासंघाने त्याला ‘कँडिडेट कंट्री’ म्हणून दर्जा दिला आहे. त्यानंतर मोल्दोव्हाने नाटोच्या सदस्यत्वासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

plot by Russiaकाही दिवसांपूर्वीच, पाश्चिमात्य देशांकडून सुरू असणाऱ्या हालचाली बघता मोल्दोव्हा हा देश ‘नवा युक्रेन’ ठरु शकतो, असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला होता. ‘नजिकच्या काळासाठी पाश्चिमात्य देश मोल्दोव्हाला पुढचा युक्रेन म्हणून तयार करीत आहेत. मोल्दोव्हाची सूत्रे सध्या पाश्चिमात्यांनी बसवलेल्या राष्ट्राध्यक्षांकडे आहेत. सॅन्डू यांनी नाटोतील समावेशासाठी विविध मार्गांचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष सॅन्डू यांचे नागरिकत्व रोमानियाचे आहे. रोमानियात विलिन होऊन पुढे कोणत्याही प्रकारची पावले उचलण्याची त्यांची तयारी झाली आहे’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले होते. लॅव्हरोव्ह यांच्या या वक्तव्यावर मोल्दोव्हाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर गेल्याच आठवड्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, रशियाच्या मोल्दोव्हातील कटाची युक्रेनी यंत्रणांना माहिती मिळाल्याचा दावा केला होता. झेलेन्स्की यांच्या या वक्तव्याचा आधार घेत मोल्दोव्हाच्या यंत्रणांनाही काही धागेदोरे मिळाले असून सरकार उलथण्याचा कट आखण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्राध्यक्षा सॅन्डू यांनी केला. ‘पुढील काही दिवसात लष्करी प्रशिक्षण मिळालेले व नागरी गणवेशातील परदेशी एजंट मोल्दोव्हात दाखल होऊन हिंसक कारवाया घडविणार आहेत. सरकारी इमारतींवर हल्ले होऊ शकतात. घटनात्मक आधार असलेले सरकार खाली खेचणे हा याचा उ द्देश आहे’, असा दावा मोल्दोव्हाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. मात्र मोल्दोव्हा सरकार रशियाची कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही, असेही राष्ट्राध्यक्षा सॅन्डू यांनी बजावले.

leave a reply