ऍडमिरल हरी कुमार यांनी भारताचे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

नवी दिल्ली – ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी मंगळवारी भारतीय नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ‘भारतीय नौदलाच्या २५व्या नौदलप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय नौदल नेहमीच राष्ट्रीय सागरी हित आणि सागरी सुरक्षाविषयक आव्हानांवर लक्ष केंद्रित करीत आले आहे. मी माझ्या नौदलप्रमुखांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्षमता वापरुन नौदलाच्या कामगिरीकडे लक्ष देईन’, असा विश्‍वास ऍडमिरल हरी कुमार यांनी यावेळी व्यक्त केला.

ऍडमिरल हरी कुमार यांनी भारताचे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलानौदलप्रमुख हरी कुमार यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. नौदल प्रमुखपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ऍडमिरल कुमार हे मुंबईच्या पश्‍चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते. हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हालचाली आणि संरक्षणदलाचे थिएटर कमांड स्थापन होत असताना ऍडमिरल हरी कुमार यांची नौदलप्रमुख पदी नियुक्ती झाली असून त्यांच्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत.

ऍडमिरल कुमार १ जानेवारी १९८३ रोजी भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या ३८ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली. हरी कुमार हे खडकवासला येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. ऍडमिरल हरी कुमार यांनी भारताचे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाआपल्या कारकिर्दीत त्यांनी आयएन निशंक, कोरा, रणवीर आणि आयएनएस विराट या विमानवाहू जहाजाचे नेतृत्व केले. यासह तोफखाना व्यवस्थापन तज्ञ म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. याचबरोबर सेशेल्स सरकारचे नौदल सल्लागार, मोगादिशू येथे सोमालिया मधील संयुक्त राष्ट्र मोहीम आणि आयएनएस द्रोणाचार्यचे प्रशिक्षण कमांडर म्हणून त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी पश्‍चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. पश्‍चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, व्हाइस ऍडमिरल एबी सिंग यांनी पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे . भारतीय नौदलाच्या दोन्ही ऑपरेशनल कमांडचे नेतृत्व करण्याचा अतुलनीय सन्मान मिळालेल्या मोजक्या कमांडर-इन-चीफपैकी ते आहेत.१ जुलै १९८३ रोजी नौदलात नियुक्त झालेले, व्हाईस ऍडमिरल एबी सिंग हे नेव्हिगेशन आणि दिशा तज्ञ आहेत.

leave a reply