इम्रान खान यांच्या सुटकेनंतर पाकिस्तानातील हिंसाचार थांबला

- पण अधिक भयंकर संघर्ष पेटण्याची शक्यता बळावली

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इम्रान खान यांची गुरुवारी सुटका झाली. मात्र त्याआधी पाकिस्तानात 50 जणांचा बळी, शंभराहून अधिक जखमी झाले असून हजारांहून अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे. ही अधिकृत पातळीवर दिलेली माहिती आहे. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसात पाकिस्तानला याहूनही कितीतरी अधिक नुकसान सोसावे लागल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या रुपयात मोठी घसरण झाली असून एका डॉलरसाठी तीनशे रुपये मोजावे लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. असे असले तरी इम्रान खान यांच्या सुटकेनंतरही पाकिस्तानातील अंतर्गत संघर्ष थांबणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

इम्रान खान यांच्या सुटकेनंतर पाकिस्तानातील हिंसाचार थांबला - पण अधिक भयंकर संघर्ष पेटण्याची शक्यता बळावलीगुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्या मरिअम औरंगझेब यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सासू इम्रान खान यांच्या पक्षाच्या सदस्या आहेत, याकडे मरिअम औरंगझेब यांनी लक्ष वेधले. त्यामुळे इम्रान खान यांच्या सुटकेनंतर पाकिस्तानचे झालेले अब्जावधी रुपयांचे नुकसान व 50 जणांचा बळी गेला, याची सारी जबाबदारीही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घ्यावी, असा टोला मरिअम औरंगझेब यांनी लगावला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी इम्रान खान यांना हे प्रकरण अधिक चिघळू देऊ नका, असे आवाहन केले आहे.

गुरुवारच्या दुपारपर्यंत पाकिस्तानात सुरू असलेली जाळपोळ व मोडतोड इम्रान खान यांच्या सुटकेनंतर थांबली खरी. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानात गृहयुद्ध पेटणार असल्याचे आत्तापासूनच दिसू लागले आहे. ज्यांनी हिंसाचार केला त्यांना मोकळे सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे. लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी देखील दंगेखोरांची ओळख पटवून त्यांना शासन केले जाईल, असा इशारा दिला आहे. मात्र पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनाच लक्ष्य करण्याची तयारी इम्रान खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचे दिसते.

पाकिस्तानी लष्करातील असंतुष्ट अधिकाऱ्यांचा गट इम्रान खान यांच्या बाजूने व सध्याचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्या विरोधात आहे. हिंसक निदर्शने करणांवर कठोर कारवाईचे आदेश लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी दिले होते. पण हे आदेश मानण्यास खैबर पख्तुनख्वामधील लष्करी अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. इम्रान खान यांच्या सुटकेनंतर पाकिस्तानातील हिंसाचार थांबला - पण अधिक भयंकर संघर्ष पेटण्याची शक्यता बळावलीया अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानी लष्करात दुफळी माजल्याचे जगजाहीर झाले.

पाकिस्तानचे नौदलप्रमुख व वायुसेनाप्रमुख देखील जनरल मुनीर यांच्यावर नाराज असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे पुढच्या काळात जनरल मुनीर यांच्यावर इम्रान खान व त्यांच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या पातळीवर हल्ले चढविले जातील, असे दिसू लागले आहे. मात्र इम्रान खान यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षातील काही नेते परकीय शक्तींशी संबंध ठेवून असल्याचा आरोप सुरू झाला आहे. इम्रान खान यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनीच त्यांची अटक घडवून आणली, असा आरोप या नेत्याने केला आहे.

अशारितीने पाकिस्तानात केवळ राजकीयच नाही, तर लष्करी पातळीवरही गदारोळ माजल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे लष्कर एकसंघ राहिलेले नाही. उलट लष्करी अधिकाऱ्यांमधली स्पर्धा आता भयंकर बनली असून याचे विघातक परिणाम देशाला भोगावे लागतील, असे इशारे पाकिस्तानी विश्लेषकांनी दिले होते. या संघर्षामुळे पुढच्या काळात पाकिस्तानच्या चिरफळ्या उडतील आणि याची खात्री पटलेली मंडळी हा देश सोडून चालली आहेत, असे हे विश्लेषक बजावत आहेत.

हिंदी English

 

leave a reply