रणगाडाभेदी ‘नाग’ संरक्षणदलात दाखल होण्यासाठी सज्ज

- शेवटची चाचणी यशस्वी ठरली

पोखरण – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’कडून (डीआरडीओ) राजस्थानच्या पोखरणमध्ये स्वदेशी बनावटीचे अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्र ‘नाग’ची चाचणी घेण्यात आली. ‘नाग’ची ही अंतिम चाचणी होती. त्यामुळे हे क्षेपणास्त्र भारतीय लष्करात लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच नाग उत्तर लडाखमध्ये चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दोनच दिवसांपूर्वी याच क्षेपणास्त्राची विकसित आवृत्ती असलेल्या रणगाडाभेदी ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

रणगाडाभेदी 'नाग' संरक्षणदलात दाखल होण्यासाठी सज्ज - शेवटची चाचणी यशस्वी ठरलीगुरुवारी पोखरणमधील लष्कराच्या तळावर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ‘नाग’ची चाचणी पार पडली. डीआरडीओकडून यापूर्वीही नाग क्षेपणास्त्राच्या आतापर्यँत १० युजर ट्रायल घेण्यात आल्या आहेत. नाग क्षेपणास्त्राची रेंज ४ किलोमीटरची आहे. ‘नाग’ क्षेपणास्त्र दिवस किंवा रात्री दोन्ही वेळा प्रभावी आहे. हे क्षेपणास्त्र कुठल्याही प्रकारच्या रणगाडे आणि लष्करी वाहनांना भेदण्यास सक्षम आहे. तसेच हे क्षेपणास्त्र कोणत्याही तापमानात लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.

रणगाडाभेदी 'नाग' संरक्षणदलात दाखल होण्यासाठी सज्ज - शेवटची चाचणी यशस्वी ठरलीया क्षेपणास्त्राची ही शेवटची चाचणी असल्याने लवकर हे क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल होईल. तसेच अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांसाठी इतर देशांवरील निर्भरताही संपेल. भारत चार किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांची इस्रायल आणि अमेरिकेकडून आयात करतो. १५ जून रोजी लडाखच्या गलवानमधील संघर्षानंतर भारताने तातडीने इस्रायलकडून रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांची आयात करण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या अडीच महिन्यात डीआरडीओने १३ निरनिरळ्या क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतल्या आहेत. यामधे सुपरसोनिक, हायपरसोनिकसहित वेगवेगळ्या क्षमतेच्या क्षेपणास्त्राच्या चाचण्यांचा समावेश आहे.

leave a reply