ऑस्ट्रेलिया-दक्षिण कोरियात लष्करी सहकार्यावर चर्चा

सेऊल – दक्षिण कोरियात झालेल्या सत्ताबदलानंतर या देशाचे लष्करी धोरण आक्रमक बनले आहे. दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी उत्तर कोरियाविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील दक्षिण कोरियाची भूमिका व्यापक करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री ली जाँग-सूप सध्या ऑस्ट्रेलिया च्या दौऱ्यावर आहेत. दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया तील लष्करी सहकार्य विस्तारण्यासाठी संरक्षणमंत्री ली जाँग कॅनबेरामध्ये दाखल झाले आहेत.

military-cooperationदक्षिण कोरियन संरक्षणमंत्री पाच दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांची भेट घेऊन संरक्षणमंत्री ली जाँग यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर गुरुवारी दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटणार आहेत. यामध्ये उत्तर कोरियापासून वाढत असलेला धोका आणि सुरक्षित इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी लष्करी सहकार्य वाढविण्याच्या मुद्यांचा सहभाग असेल, असा दावा केला जातो.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया हा भारत, अमेरिका आणि जपान यांच्याबरोबर ‘क्वाड’ या संघटनेचा सदस्य देश आहे. क्वाडमध्ये आपल्याला देखील स्थान मिळावे, यासाठी दक्षिण कोरियाचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांमधील चर्चेत देखील हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

leave a reply