केक, पेस्ट्रीमधून अमली पदार्थांचा पुरवठा

- मालाडमध्ये बेकरीवर एनसीबीचा छापा

मुंबई – द नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईच्या मालाडमधील एका बेकरीवर छापा टाकून मारिजुआना आणि 830 ग्रॅम विड केक जप्त केले. पहिल्यांदाच अशाप्रकारे केक व पेस्ट्रीजमध्ये मिसळून अमली पदाथार्र्ंचे सेवन होत असल्याचा नवा ट्रेंड उघड झाला आहे.

Advertisement

केक, पेस्ट्रीमधून अमली पदार्थांचा पुरवठा - मालाडमध्ये बेकरीवर एनसीबीचा छापाएनसीबीतर्फे देेशात अमली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. ठिकठिकाणी छापे मारले जात असून तस्कर, पुरवठादार व विक्रेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. शनिवारी रात्री मालाडच्या ऑर्लेम भागात असलेल्या एका बेकरीवर एनसीबीने छापा टाकला. या बेकरीत अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. याआधारे ही कारवाई करण्यात आली. या बेकरीत एका डब्यातून गांजा सापडला. त्यानंतर बेकरीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना धाक दाखविल्यावर त्यांनी सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

यानुसार बेकरीत इडिबल पॉट ब्राउनी आणि विड पॉट ब्राउनी विकण्यात येत होत्या. केक आणि पेस्ट्रीज् गांजा आणि हशीस मिसळून त्याचा पुरवठा करण्यात येत होता. अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांनी केकद्वारे अमली पदार्थांचे सेवन करण्याचा नवा प्रकार शोधून काढला असून सध्या तरुणांमध्ये तसा ट्रेंड सुरू असल्याचा खुलासा चौकशीत झाला. हशीशचा अमल हा सिगरेटद्वारे सेवन करण्यापेक्षा अशा रितीने सेवन केल्यास दिर्घकाळ राहत असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. केक बेक करतानाच अमली पदार्थांच्या वापराचे हे देशातील पहिलेच प्रकरण आहे. यातून सध्या सुरू झालेल्या नव्या ट्रेंडचा पर्दाफाश झाला आहे. या बेकरीत ही अमली पदार्थ मिश्रीत पेस्ट्री हजार रुपयाला विकली जात असल्याचे वृत्त आहे.

या प्रकारणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या महितीच्या आधारे वांद्य्रातूनही एका अमली पदार्थ पुरवठादाराला एनसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडे 125 ग्रॅम गांजा सापडला.

leave a reply