बलोच बंडखोरांच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह तीन ठार

क्वेट्टा – गेल्या २४ तासात बलोचिस्तानच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन जवान ठार झाले. काही दिवसांपूर्वी बलोच बंडखोरांनी पाकिस्तानबरोबर ‘सीपीईसी’चा करार करणार्‍या चीनला इशारा दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने बलोच बंडखोरांविरोधात लष्करी मोहीम हाती घेतली होती. यात पाकिस्तानी लष्कराला फार मोठी हानी सहन करावी लागत आहे.

बलोच बंडखोरांच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह तीन ठारबलोचिस्तानच्या कोहली जिल्ह्यात लष्कराने बलोच बंडखोरांविरोधात मोहीम छेडली. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा कॅप्टन पदावरील अधिकारी मारला गेला. यानंतर लष्कराने हेलिकॉप्टर रवाना करून बलोच बंडखोरांवर हवाई हल्ल्याची तयारी केली होती. पण त्याआधीच बलोच बंडखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला, असे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे.

मात्र बलोच बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानी लष्कराचे किमान चार जवान या संघर्षात ठार झाले. कोहली जिल्ह्यातील हल्ल्याबरोबरच ग्वादरमधील बदोक भागातही बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या गस्ती पथकाला लक्ष्य केले. या हल्ल्यात तीन जवान मारले गेले. पाकिस्तानी लष्कर स्थानिकांना पकडून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करीत असल्याचा आरोप बलोच बंडखोर संघटना करीत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी आपण हल्ले करीत असल्याचे दावा बंडखोरांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच बलोचिस्तानवर अत्याचार होत आहेत. भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलोचिस्तानला कधीही न्याय मिळालेला नाही. उलट बलोचिस्तानमध्ये पंजाब तसेच इतर प्रांतांमधील नागरिकांना वसून इथल्या मूळ निवासींचे अधिकार डावलण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने केला होता. किनारपट्टी व नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असेलल्या या प्रांताची पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने लूटमार केली, अशी भावना इथल्या जनतेमध्ये आहे. बलोच बंडखोरांच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह तीन ठारयाच्या विरोधात आवाज उठविणार्‍यांचा वेगवेगळ्या मार्गाने काटा काढून पाकिस्तानच्या लष्कराने बलोच जनतेवर अत्याचार सुरू ठेवले होते.

पण आता बलोच बंडखोर संघटना एकत्र आल्या असून त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधातील लढा तीव्र केला आहे. याचे परिणाम पाकिस्तानच्या लष्कराला सहन करावे लागत असून बलोच बंडखोर नसून दहशतवादी असल्याचे दावे पाकिस्तानकडून केले जात आहेत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र बलोची नेते व कार्यकत्यांना सहानुभूती मिळत आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या लष्कराने बलोचिस्तानमधील अत्याचारांची तीव्रता अधिक वाढविली. त्यावर बलोच बंडखोर संघटनांची हिंसक प्रतिक्रिया उमटत असून याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार असल्याचे दिसत आहे.

leave a reply