मणिपूरमध्ये २८७ कोटी रुपयांची ब्राऊन शुगर जप्त

थोउबाल – मणिपूरच्या थोउबाल जिल्ह्यात सुरक्षादलांच्या जवानांनी केलेल्या कारवाईत २८७ कोटी रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त केली. गेल्या काही महिन्यांमध्ये ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

ब्राऊन शुगर

थोउबाल जिल्ह्यातील कामू भागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचासाठा लपवून ठेवण्यात आला असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विविध भागात मोहीम हाती घेतली. लवकरच हे अंमली पदार्थ वेगवेगळ्या भागात विक्रीसाठी पाठवण्यात येणार होते. त्यापूर्वीच कारवाई करत अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला.

तीन पिशव्यांमध्ये ही ब्राउन शुगर भरण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २८७ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ३० ऑक्टोबरला थोउबाल जिल्ह्यातील थोबाल मोइजिंग अवंग लिकाई भागातून पोलिसांनी सुमारे ४३५ किलो ब्राऊन शुगर जप्त केली होती. यासह ४३८ लिटर मॉर्फिन द्रव जप्त करण्यात आले होते.

leave a reply