चीन नायजेरियातील खनिजांसाठी दहशतवाद्यांना फंडिंग करीत आहे

- ब्रिटिश वर्तमानपत्राचा गंभीर आरोप

लंडन/अबूजा – नायजेरिया या आफ्रिकन देशातील खाणक्षेत्रात काम करणारे चिनी नागरिक येथील खनिजांचे नियंत्रण मिळावे म्हणून दहशतवादी गटांना फंडिंग करीत आहे. थेट नाही पण अप्रत्यक्षपणे चीन दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप ‘द टाईम्स’ या ब्रिटिश वर्तमानपत्राने केला. चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. पण याआधी नायजेरियाच्या सुरक्षा यंत्रणांनी चिनी नागरिक व कर्मचाऱ्यांना खनिजांच्या तस्करीप्रकरणी ताब्यात घेतले होते, याकडे ब्रिटिश वर्तमानपत्राने लक्ष वेधले आहे.

चीन नायजेरियातील खनिजांसाठी दहशतवाद्यांना फंडिंग करीत आहे - ब्रिटिश वर्तमानपत्राचा गंभीर आरोपआफ्रिकेतील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या नायजेरियामध्ये चीन लाच आणि बेकायदेशीर कारभारांद्वारे दहशतवादाला अर्थसहाय्य पुरवीत असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. यासाठी नायजेरियाच्या झाम्फरा येथील खाणीचे उदाहरण या वर्तमानपत्राने दिले. झाम्फरा खाणीतील उत्खनन आणि खनिजांच्या तस्करीप्रकरणी चिनी नागरिक नायजेरियाच्या वायव्येकडे दहशतवाद्यांचे नेटवर्क चालवत असल्याचे उघड झाले होते.

सोने आणि इतर खनिजांनी समृद्ध असलेल्या नायजेरियामध्ये चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. या देशात चिनी कंपन्यांनी ठाण मांडला असून जवळपास दोन लाख चिनी नागरिक नायजेरियात काम करीत आहेत. यातील काही चिनी नागरिकांचे स्थानिक दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध असल्याचे समोर आले आहे. चीनने या देशात गुंतवणूक केल्यापासून नायजेरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये आणि अंतर्गत संघर्षात वाढ झाल्याची नोंद लागोसस्थित विश्लेषकांच्या गटाने केली.चीन नायजेरियातील खनिजांसाठी दहशतवाद्यांना फंडिंग करीत आहे - ब्रिटिश वर्तमानपत्राचा गंभीर आरोप

सोन्याच्या खाणी असलेल्या झाम्फरामधील भागातही या दहशतवादी संघटनांचे नियंत्रण असल्याचा दावा केला जातो. चिनी नागरिक स्थानिक भाषेत संवाद साधून दहशतवाद्यांशी मैत्री करीत असल्याचा आरोप ब्रिटिश वर्तमानपत्राने केला. या दहशतवाद्यांच्या जोरावर चिनी कंपन्या खाणकामगारांच्या वेतनात कपात करतात. तसेच खनिजांची तस्करीदेखील करतात. याप्रकरणी २०२० साली नायजेरियन सुरक्षा यंत्रणांनी १७ चिनी नागरिकांना अटक केली होती. तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातही एका चिनी नागरिकाला ताब्यात घेतले होते, याकडे ब्रिटिश वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

leave a reply