अमेरिकेकडून ‘चायना हाऊस’ची स्थापना

bidenवॉशिंग्टन – कट्टर प्रतिस्पर्धी चीनबाबत अमेरिकेची भूमिका विस्तारीत आणि धारदार करण्यासाठी बायडेन प्रशासनाने ‘चायना हाऊस’ची स्थापना केली. यामुळे अमेरिकेला चीनविषयी सातत्यपूर्ण भूमिका घेण्यास सहाय्य होईल, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केला.

अमेरिकेच्या सुरक्षेला चीनपासून असलेला धोका अधोरेखित करून परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी ‘चायना हाऊस’च्या स्थापनेची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. यामुळे वेगवेगळ्या विभागातील चीनविषयक विश्लेषक एकत्र येतील, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी म्हटले आहे. तर यामुळे चीनला स्पर्धा देणे सोपे जाईल, असा दावा बायडेन प्रशासनाने केला होता.

दरम्यान, अमेरिका व चीनमधील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी चायना हाऊसची निर्मिती झाल्याचा दावा केला जातो. जी-20च्या बैठकीत दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये याबाबत चर्चा झाली होती.

leave a reply