रशियाच्या ‘वॅग्नर’बाबत अमेरिकेची चिंता

russia wagner mercenariesवॉशिंग्टन/दकार – कंत्राटी जवान पुरविणारी ‘वॅग्नर’ या रशियन कंपनीच्या आफ्रिकेतील वाढत्या प्रभावाबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली. वॅग्नरसारख्या बेदरकार कंत्राटी कंपनीमुळे आफ्रिकेतील सुरक्षा व शांती धोक्यात येईल, असा इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आफ्रिकन देशांसाठी आयोजित केलेल्या बैठकीच्या समारोपावेळी बोलताना परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी वॅग्नरच्या कंत्राटी जवानांचा मुद्दा उपस्थित केला. घानाचे राष्ट्राध्यक्ष नाना अकुफो-अद्दो यांनी देखील बुर्किना फासोने दहशतवादविरोधी कारवाईसाठी रशियन कंत्राटी जवानांचे सहाय्य घेतल्याचा आरोप केला. यानंतर बुर्किना फासोने घानाच्या राजदूतांना समन्स बजावले. आफ्रिकेतील माली, बुर्किना फासो या देशांमधील रशियाच्या वॅग्नर कंपनीच्या कंत्राटी जवानांच्या तैनातीवर अमेरिका व फ्रान्सने टीका केली होती. या दोन्ही आफ्रिकी देशांनी अमेरिका व फ्रान्सची सैन्यतैनाती नाकारून रशियन कंपनीला आमंत्रित केले होते.

leave a reply