चीन, रशियाच्या बॉम्बर विमानांची दक्षिण कोरियाच्या ‘एडीआयझेड’मध्ये घुसखोरी

बॉम्बर विमानांचीमॉस्को/सेऊल – चीन आणि रशियाच्या प्रत्येकी चार बॉम्बर विमानांनी बुधवारी उत्तर कोरियाच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’ क्षेत्रात घुसखोरी केली. यानंतर दक्षिण कोरियानेही आपली लढाऊ विमाने रवाना करून चीन व रशियाच्या बॉम्बर विमानांना पिटाळून लावल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी चीन व रशियाच्या विमानांनी आमच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप जपानने केला होता.

दक्षिण कोरियाच्या लष्कराने चीन व रशियन विमानांच्या या घुसखोरीची माहिती दिली. बुधवारी सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी चीन व रशियाच्या बॉम्बर्सनी तीन बाजूंनी दक्षिण कोरियाच्या ‘एडीआयझेड’च्या क्षेत्रात घुसखोरी केली. यामध्ये रशियाच्या ‘टीयू-९५’ व ‘सुखोई-३५’ या बॉम्बर विमानांचा समावेश होता. रशियन बॉम्बर्सनी दक्षिण कोरियाच्या लष्करी हवाईहद्दीच्या उत्तरेकडून प्रवेश केला. तर चीनच्या ‘एच-६ स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सनी दक्षिण कोरियन ‘एडीआयझेड’च्या पूर्व व दक्षिण बाजूने घुसखोरी केली.

ही कारवाई आपल्या हवाई गस्तीचा एक भाग असल्याचे रशियाने म्हटले आहे. पण दोन्ही देशांच्या बॉम्बर्सनी विनापरवानगी ही घुसखोरी केल्याचा आरोप दक्षिण कोरियन लष्कराने केला आहे.

leave a reply