सौदी-इराण डील घडवून चीनने ‘वर्ल्ड ऑर्डर’च्या स्थापनेसाठी पावले टाकली

- अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा दावा

वॉशिंग्टन – ‘‘वर्ल्ड ऑर्डर अर्थात जागतिक व्यवस्थेत आपल्याला सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी चीन सातत्याने करीत होता. आता सौदी अरेबिया आणि इराणमध्ये ‘डील’ घडवून चीन वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत’’, असे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी म्हटले आहे. त्याचवेळी कित्येक दशकांपासूनचा अमेरिकेचा सहकारी देश असलेला सौदी अरेबिया आता अमेरिका व चीनमध्ये समतोल साधत असल्याचेही या निमित्ताने समोर आल्याचे किसिंजर यांनी स्पष्ट केले.

सौदी-इराण डील घडवून चीनने ‘वर्ल्ड ऑर्डर’च्या स्थापनेसाठी पावले टाकली - अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा दावागेल्या 12 वर्षांपासून सौदी व इराणचे राजनैतिक पातळीवरील सहकार्य खंडीत झाले होते. अशा परिस्थितीत चीनने मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणला. याचे श्रेय चीनला मिळत असून यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील चीनचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे. विशेषतः आखाती क्षेत्रात आता अमेरिकेची जागा दुसरा कुणीही घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती उरलेली नाही. चीन अमेरिकेचे आखातातील स्थान पटकावत आहे, असे अमेरिकन विश्लेषक व पत्रकार सांगत आहेत. हेन्री किसिंजर यांनी देखील याला दुजोरा दिल्याचे दिसते.

सौदी व इराणमधील सहकार्यामुळे इस्रायलसमोरील आव्हान वाढले आहे. कारण पुढच्या काळात इराणवर दबाव टाकताना, यापुढे चीनचे हितसंबंध देखील विचारात घ्यावे लागणार आहेत, याची जाणीव किसिंजर यांनी करून दिली. इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना, सौदी व इराणमध्ये झालेली डील इस्रायलच्या चिंतेत भर घालत असल्याची बाब किसिंजर यांनी लक्षात आणून दिल्याचे दिसत आहे.

सौदी-इराण डील घडवून चीनने ‘वर्ल्ड ऑर्डर’च्या स्थापनेसाठी पावले टाकली - अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा दावाबायडेन प्रशासनाने जाणीवपूर्वक आखाती क्षेत्राकडे दुर्लक्ष करून इथे चीन व रशियासारख्या देशांना आपला प्रभाव वाढविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याची टीका अमेरिकन विश्लेषक, पत्रकार व मुत्सद्दी करीत आहेत. यामुळे आखाती क्षेत्रातील अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात आले आहेत. पुढच्या काळात ही चूक महागात पडेल, असे या सर्वांचे म्हणणे आहे. यावर अमेरिकेच्याहेन्री किसिंजर, यडेन प्रशासनाने थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सौदी व इराणमधील ‘डील’वर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी समाधान व्यक्त केले आहे. पण इराण आपण दिलेल्या आश्वासनांवर ठाम राहिल का, अशी शंका अमेरिकेच्या पररष्ट्रमंत्र्यांनी उपस्थित केली आहे.

दरम्यान, सध्या सौदी-इराणमध्ये मध्यस्थी करून चीन त्याचे श्रेय घेत आहे खरा. पण येमेनमधील हौथी बंडखोर, तसेच बाहरिनसारखा देश यावर सावध प्रतिक्रिया देत आहेत. इराणचे सौदीबरोबरील संबंध सुधारले तरी आपल्या सौदीविरोधी कारवाया थांबणार नाहीत, असे हौथी बंडखोरांनी बजावले आहे. तर इराण व सौदीमधील सहकार्याचा आखाती देशांच्या इस्रायलबरोबरील सहकार्यावर परिणाम होणार नाही, असे बाहरिनने जाहीर केले आहे. त्यामुळे इराण व सौदीमधील सहकार्याकडे आखाती क्षेत्रात सावधपणे पाहिले जात असल्याचे दिसते.

हिंदी English

 

 

leave a reply