चीनमधील उलथापालथींमुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्राचा विकासदर घसरणार

- वर्ल्ड बँकेचा निष्कर्ष

आशिया-पॅसिफिकबीजिंग – कोरोनाची साथ रोखण्यासाठी चीनने राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे आर्थिक पातळीवर मोठे हादरे बसले असून त्याचा परिणाम आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या आर्थिक विकासदरावर झाल्याचे ‘वर्ल्ड बँके’ने बजावले आहे. ‘झीरो कोविड पॉलिसी’मुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावली असून 2022 साली चीनचा विकासदर जेमतेम 2.8 टक्के असेल, असे भाकित वर्ल्ड बँकेने केले. यापूर्वीच्या अहवालात वर्ल्ड बँकेने चीनचा विकासदर पाच टक्के राहिल असा दावा केला होता.

मात्र आता त्यात मोठी घट करण्यात आली आहे. चीनमधील या घसरणीचा फटका आशिया-प्रशांत क्षेत्राला बसला असून त्याचा विकासदरही 3.2 टक्क्यांपर्यंत झाली येण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. यापूर्वी तो पाच टक्क्यांवर राहण्याचा अंदाज होता.

2022 पाठोपाठ 2023 सालीही चीनचा विकासदर पाच टक्क्यांखालीच राहिल, असे वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. वर्ल्ड बँकेपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच आशियाई विकास बँकेनेही चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या घसरण होईल, असा निष्कर्ष नोंदविला होता.

leave a reply