चीन २०२५ साली तैवानवर आक्रमण करील

- तैवानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

तैपेई/बीजिंग – ‘चीनच्या संरक्षणदलांकडे आजही तैवानवर हल्ला चढविण्याची क्षमता आहे. मात्र आता चिथावणी दिल्याशिवाय ते हल्ला करण्याची शक्यता नाही, कारण त्याची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागेल. पण २०२५ सालापर्यंत चीन युद्धाचा खर्च व त्यातून होणारी हानी नीचांकी पातळीवर आणेल. त्यानंतर चीन तैवानवर सर्वंकष हल्ला चढविल’, असा इशारा तैवानचे संरक्षणमंत्री चिऊ कुआ-चेंग यांनी दिला. तैवानचे संरक्षणमंत्री २०२५चा इशारा देत असतानाच, तैवानच्या सुरक्षेसाठी पुढील १२ महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनी बजावले आहे.

चीन २०२५ साली तैवानवर आक्रमण करील - तैवानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारागेल्या चार दिवसात चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केल्याचे उघड झाले. या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्री चेंग यांनी चीनच्या वाढत्या आक्रमतेवर प्रतिक्रिया देताना, सर्वंकष हल्ल्याबात इशारा दिला. चेंग हे माजी लष्करी अधिकारी असून, सध्या तैवान क्षेत्रात निर्माण झालेला तणाव गेल्या चार दशकांमधील सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी नजिकच्या काळात तैवान दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह ‘अँटी-शिप वेपन्स’वर भर देईल, असेही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

चीन २०२५ साली तैवानवर आक्रमण करील - तैवानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशाराचीनकडून तैवान क्षेत्रात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानने चीनच्या हालचालींवर टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅक्मास्टर यांनी, हॉंगकॉंग मुद्यावर फारसे परिणाम न जाणवल्याने चीनचे नेतृत्त्व अधिकच धाडसी झाल्याचे बजावले आहे. चीन वेगाने आपले संरक्षणसामर्थ्य वाढवित असून अमेरिका व सहकारी देशांनाही आपली सज्जता वाढविण्यावर भर देणे भाग पडत आहे, असा दावा त्यांनी केला.

चीन २०२५ साली तैवानवर आक्रमण करील - तैवानच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा‘२०२२ साली ऑलिंपिक स्पर्धा व चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन झाल्यानंतर तैवान लक्ष्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२२ हे साल तैवान क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टिेने खूप महत्त्वाचे ठरेल’, असे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅक्मास्टर यांनी बजावले. अनेक विश्‍लेषक व तज्ज्ञांनीही याचा उल्लेख केला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हडसन इन्स्टिट्यूट या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात संबोधित करताना मॅक्मास्टर यांनी, अमेरिका-ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान करण्यात आलेल्या ‘ऑकस डील’चीही प्रशंसा केली.

leave a reply