इराणमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीची तीव्रता वाढली

तेहरान – गेल्या २४ तासात इराणमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीने १४४ जणांचा बळी घेतला. इराणमधील या साथीची बळींची एकूण संख्या २०९८वर पोहोचली आहे. तर या देशात कोरोनाव्हायरसचे तब्बल ४४ हजार रुग्ण आहेत.

गेल्या चोवीस तासात इराणमध्ये या साथीचे ३१११ रुग्ण आढळले आहेत. या साथीचा मुकाबला करण्यात इराणची आरोग्ययंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे इराणमध्ये प्रचंड प्रमाणात घबराट माजली असून गैरसमजुती व अफवांमुळेही इराणमध्ये बळी जाऊ लागले आहेत.

त्यातच अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे या साथीचा सामना करणे इराणसाठी अधिकच अवघड बनले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अशी कबुलीही दिली होती. यानंतरही अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेण्यास नकार दिला होता. उलट नवीन निर्बंध लावून अमेरिकेने इराणला सज्जड इशारा दिला होता.

यामुळे इराणमध्ये भयंकर मानवी आपत्ती निर्माण झाली असून एकाच वेळी महामारी व त्याच्याबरोबर बेरोजगारी आर्थिक मंदी अशा अनेक आव्हानांना इराणला तोंड द्यावे लागत आहे .याचे सामाजिक व राजकीय परिणाम दिसू लागले असून इराणच्या राजवटीवर याचे फार मोठे दडपण आल्याचे दिसत आहे.

leave a reply