आफ्रिकन खंडातील 45 देशांमध्ये  कोरोनाव्हायरसचा फैलाव 

जोहान्सबर्ग – आफ्रिका खंडातील 45 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे, तसेच  आतापर्यंत 58 आफ्रिकन नागरिक दगावले आहेत. तसेच  आफ्रिका खंडात या साथीची लागण झालेल्यांची संख्या 1900 च्या पुढे गेली आहे. वैद्यकीय साधने व आरोग्य विषयक सुविधा या आघाडीवर खूपच मागे असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये ही साथ येत्या काही दिवसात भीषण स्वरूप धारण करील असे संकेत मिळू लागले आहेत.
 इजिप्तमध्ये सर्वाधिक 19 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत या साथीचे  554 रूग्ण आढळले असून यानंतर दक्षिण आफ्रिकन सरकारने  लॉकडाऊन जाहीर केला आहे. आफ्रिकेतील कोरोना व्हायरसच्या फैलावावर  “आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेंन्शन ”  लक्ष ठेवून आहे.  या संस्थेने आफ्रिकन देशांमध्ये  कोरोनाव्हायरसची चाचणी करणाऱ्या  लॅबोरेटरी सुरू केल्या आहेत. 
प्रगत व विकसित देशांनाही कोरोनाव्हायरसचा सामना करणे अवघड बनले असून हे देश असहाय्य स्थितीत असल्याचे दिसते. त्यापार्श्वभुमीवर अविकसित व मागासलेल्या आफ्रिकन देशांमध्ये ही साथ हाहाकार माजला शकेल, अशी भयावह शक्यता समोर येत आहे.

leave a reply