देशाने आर्थिक धोके टाळण्यासाठी सज्ज रहावे

- एफएसडीसीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्र्यांची सूचना

नवी दिल्ली – जगावर आर्थिक मंदीचे संकट कोसळणार हे जवळपास निश्चित झालेले असताना, याचा देशाच्या वित्तीय स्थैर्यावर परिणाम होणार नाही, यासाठी अतिशय सावध राहण्याची आवश्यकता आहे. सायबर सुरक्षेसाठीही देशाला अधिक सज्ज राहणे भाग आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ‘फायनॅन्शिअल स्टेबिलिटी अँड डेव्हलपमेंट काऊन्सिल-एफएसडीसी’च्या २७ व्या बैठकीत अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. तर सायबर सुरक्षेपासून ते संकटाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभारण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींवर आपल्याला काम करावे लागेल, असे केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यावेळी म्हणाले.

देशाने आर्थिक धोके टाळण्यासाठी सज्ज रहावे - एफएसडीसीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्र्यांची सूचनाया वर्षी जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, असा इशारा जगभरातील अर्थतज्ज्ञ देत आहेत. काही अर्थतज्ज्ञांनी तर ही आर्थिक मंदी २००८ सालच्या मंदीपेक्षाही भयावह असेल, असा इशारा दिला आहे. अमेरिकेतील बँकांची दिवाळखोरी हा इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याचे दाखवून देत आहे. या भयावह आर्थिक संकटाचे पडसाद भारतात उमटणार नाहीत, यासाठी वेळीच योग्य ती पावले उचलणे भाग आहे. त्याची तयारी ‘एफएसडीसी’ने करावी, असे आवाहन सीतारामन यांनी केले.

भारताचे वित्तीय क्षेत्र अतिशय सुरक्षित आणि सुनियंत्रित आहे. तरीही आपल्याला अधिक सावध राहणे भाग आहे, असे केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यावेळी म्हणाले. जगावर आर्थिक संकट कोसळल्यानंतर विविध क्षेत्रावर त्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करायला हवी. त्यामुळे पडझड सुरू होण्याच्या आधीच आपल्याला योग्य त्या कारवाया वेळीच करता येतील, असे सेठ यांनी म्हटले आहे. यासाठी एफएसडीसीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सेठ यांनीही केले.

अर्थमंत्री सीतारामन यांनी सायबर सुरक्षेसाठी अधिक सजगता दाखविण्याचे आवाहन केले, याचा धागा पकडून अजय सेठ यांनी यांनी वित्तीय क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अधिक तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे दावा केला.

हिंदी

 

leave a reply