इस्रायलमधील चीनच्या राजदूताचा मृत्यू

तेल अविव- इस्रायलमधील चीनचे राजदूत दु वेई रविवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. इस्रायली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याची माहिती इस्रायलच्या परराष्ट्र विभागाने दिली. वेई यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना कळविल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात दु वेई यांनी इस्रायलमध्ये राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यावेळी कोरोनाव्हायरसची साथ सुरु असल्याने वेई यांना दोन आठवडे घरातच क्वारंटाईन व्हावे लागले होते. इस्रायलमध्ये राजदूत म्हणून काम करण्यापूर्वी वेई यांनी युक्रेनमध्ये राजदूत म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

इस्रायलच्या आरोग्य यंत्रणांनी ५८ वर्षांच्या चिनी राजदूतांचा मृत्यू झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अहवाल दिला आहे.

leave a reply