इराणबरोबरच्या अणुकरारावर अजूनही राजनैतिक वाटाघाटी शक्य

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

iran nuclearवॉशिंग्टन/तेहरान – इराणबरोबरचा अणुकरार ‘डेड’ अर्थात मृतवत बनल्याचा दावा अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत होता. इराणने युक्रेनवर हल्ला चढविणाऱ्या रशियाला ड्रोन्सचा पुरवठा केला होता. तसेच आपल्या देशातील निदर्शकांवर कठोर कारवाई करून इराणने पाश्चिमात्य देशांचा रोष ओढावून घेतलेला आहे, याचा दाखलाही अमेरिकेकडून सातत्याने दिला जातो. असे असले तरी अजूनही इराणबरोबरील अणुकरारावर वाटाघाटींची शक्यता पूर्णपणे निकालात निघालेली नाही, अशा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन स्वतःहून इराणबरोबरचा अणुकरार संपुष्टात आल्याचे एका इराणच्या महिला निदर्शकाला सांगत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. त्याला छेद देणारी विधाने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहेत. ‘इराणचा अणुकार्यक्रमापसून असलेला धोका फक्त राजनैतिक वाटाघाटीने कमी करता येईल, यावर अमेरिकेचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत या वाटाघाटींचा वापर करण्यात आला होता आणि यापुढेही तसेच प्रयत्न सुरू राहतील’, असा दावा परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी स्पष्ट केले.

Image: ROMANIA-NATO-US-POLITICSपण, ‘इराण या वाटाघाटींसाठी आणि याआधीच्या अणुकरारासाठी तयार नसेल तर अमेरिकेला वेगळ्या पर्यायांवर विचार करावा लागेल’, असा इशाराही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन वचनबद्ध असल्याचेही ब्लिंकन म्हणाले. अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारासाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉबर्ट मॉली यांनीही इराणबरोबरचा अणुकरार मृत झाला नसल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकेबरोबर अणुकरार करण्याची सुवर्णसंधी इराणकडे होती. पण युक्रेनच्या युद्धात रशियाला ड्रोन्सचा पुरवठा करून आणि आपल्या देशातील निदर्शकांवर कारवाई करून इराणने ही संधी वाया दवडल्याची टीका मॉली यांनी केली. असे असले तरी इराणने अणुकरारासाठी पुन्हा प्रयत्न केले तर तो शक्य असल्याचा दावा मॉली यांनी केला. युरोपिय देशाने देखील इराणबरोबरच्या अणुकराराची आशा सोडलेली नाही, असे संकेत देत आहेत.

तर अमेरिका व पाश्चिमात्य देश रेड लाईन्स अर्थात मर्यादारेषा न ओलांडता इराणबरोबर अणुकरारासाठी तयार असतील तर हा अणुकरार शक्य होऊ शकतो, असे इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमीर अब्दुल्लाहियान यांनी म्हटले आहे. यामध्ये इराणच्या अंतर्गत कारभारातील पाश्चिमात्य देशांचा हस्तक्षेप याचा समावेश असल्याचे संकेत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले आहेत. अमेरिका व युरोपिय महासंघाने इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांचे समर्थन करून इराणच्या नेत्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत.

leave a reply