डीआरडीओने व्हेंटिलेटर, सॅनिटायझर तयार केले 

डीआरडीओने व्हेंटिलेटर, सॅनिटायझर तयार केले 
नवी दिल्ली – “संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे”ने(डीआरडीओ) कोरोनाव्हायरसच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे. देशभरातल्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन डीआरडीओने नवीन व्हेंटिलेटर विकसित केले असून असे  व्हेंटिलेटर बनविण्याचे तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंंपन्यांंना दिले आहे. याआधी डीआरडीओने मास्क व सॅनिटायझर तयार  केले असून संरक्षण दल तसेच आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांना पुरविले आहे.

देशभरात  व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन डीआरडीओने  “सोसायटी फॉर बायोमेडिकल टेक्नॉलॉजी” (एसबीएमटी) सोबत एक व्हेंटिलेटर विकसित केला आणि त्याचे तंत्रज्ञान म्हैसूरमधील वेंटिलेटर उद्योगाला हस्तांतरित केले, ह्या कंपन्याकडे महिन्याला पाच हजार व्हेंटिलेटर तयार करण्याची क्षमता आहे मात्र डीआरडीओने दिलेल्या तंत्रज्ञानामुळे या कंपन्या दहा हजार व्हेंटिलेटर बनवू शकतात, अशी माहिती डीआरडीओचे संचालक डॉ. सतीश रेड्डी यांनी दिली आहे.

कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशाला  भेडसावत असलेल्या सॅनिटायझर व मास्क तयार करण्याचे काम डीआरडीओने सुरू केले आहे. डीआरडीओने आत्तापर्यंत वीस हजारांहून अधिक सॅनिटायझरच्या बॉटल्स बनविल्या असून तीनही संरक्षण दल व आरोग्य मंत्रालयाला पुरविल्या  आहेत. याशिवाय सॅनिटायझर तयार करण्याचे तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्याना दिले असून यामुळे या कंपन्या दिवसाला दहा हजार लीटर सॅनिटायझर तयार करू शकतील, याशिवाय वीस हजार मास्क बनवून दिले आहेत, असे सतीश रेड्डी यांनी म्हटले आहे.

leave a reply