गुगलच्या डाटा सेंटरमध्ये स्फोट

- तीन जखमी

डाटा सेंटरमध्येवॉशिंग्टन – जगभरातील प्रसिद्ध सर्च इंजिन ‘गुगल’च्या अमेरिकेतील डाटा सेंटरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले. यामुळे जगभरात गुगलची सेवा काही काळासाठी खंडीत झाली होती. डाटा सेंटरमधील या स्फोटाचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अमेरिकेच्या आयोवा येथील गुगलच्या डाटा सेंटरमध्ये सोमवारी सकाळी हा स्फोट झाला. हा इलेक्किल स्फोट होता, अशी माहिती समोर येत आहे. याचा तपास सुरू असल्याचे स्थानिक तपास यंत्रणांनी सांगितले. या स्फोटामुळे गुगल सर्च आण ट्रेंड या सेवा काही काळासाठी बाधित झाल्या होत्या.

जगभरामध्ये गुगलचे एकूण २३ डाटा सेंटर्स आहेत. यापैकी १४ सेंटर एकट्या अमेरिकेतच आहेत. आयोवा येथील डाटा सेंटर हे गुगलचे सर्वात मोठे सेंटर असल्याचा दावा केला जातो.

शॉर्ट सर्किटमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. तर काहीजणांनी हा स्फोट म्हणजे मोठ्या कटाचा भाग असल्याचा ठपका ठेवलेला आहे. मात्र या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.

leave a reply