तुर्कीच्या अडवणुकीमुळे इंधनपुरवठा विस्कळीत होण्याची भीती

Turkey's blockadeइस्तंबूल – तुर्कीच्या यंत्रणांनी जागतिक इंधनपुरवठ्यासाठी महत्त्वाचा सागरी मार्ग असणाऱ्या ‘बॉस्फोरस स्ट्रेट’मधील इंधनवाहू जहाजांची कडक तपासणी सुरू केल्याचे समोर येत आहे. या तपासणीमुळे या सागरी क्षेत्रात अनेक ‘ऑईल टँकर्स’ अडकून पडले असून त्याचा परिणाम जागतिक इंधनपुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रशियानेही या मुद्यावर चिंता व्यक्त केली असून तुर्कीशी बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशियन इंधनावर लागू केलेले नवे निर्बंध सोमवारपासून लागू झाले आहेत. अशा स्थितीत अनेक देशांनी रशियाव्यतिरिक्त इतर देशांकडून इंधन आयात करण्यास सुरुवात केली आहे. यातील बहुतांश टँकर्स तुर्कीच्या सागरी क्षेत्राचा वापर करतात. मात्र तुर्कीने जहाजांचा विमा व इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली असून आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मध्य आशियाई देशांकडून येणाऱ्या इंधनाचे टँकर्स अडकल्याचे सांगण्यात येते.

leave a reply