पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी रशियाकडून इराणला रेल्वेमार्गाने इंधनाचा पुरवठा

मॉस्को – अमेरिका आणि युरोपिय मित्रदेशांच्या निर्बंधांचे लक्ष्य ठरलेल्या रशिया व इराणने नवा पर्याय शोधला आहे. रशियाने रेल्वेमार्गाने इराणला इंधन पुरवठा सुरू केला आहे. अशा प्रकारे रशियाने इराणपर्यंत ३० हजार टन गॅसोलिन आणि डिझेलचा पोहोचविल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात उभय देशांमधील इंधन व्यवहार अधिक व्यापक होणार असल्याचा दावा केला जातो.

पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी रशियाकडून इराणला रेल्वेमार्गाने इंधनाचा पुरवठागेल्या वर्षी रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवॅक यांनी इराणचा दौरा करून ४० अब्ज डॉलर्सचा मोठा ऊर्जा करार केला होता. यानुसार रशिया व इराण परस्परांना पुढील २५ वर्षांसाठी इंधन तसेच इंधनवायूचा पुरवठा करणार आहेत. पण रशिया व इराण हे दोन्ही देश अमेरिका आणि युरोपिय मित्रदेशांनी लादलेल्या निर्बंधांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे एवढा मोठा ऊर्जा करार केल्यानंतर यासंबंधीचे सहकार्य कधीपासून सुरू करायचे, यावर रशिया व इराण विचार करीत होते.

पण फेब्रुवारी महिन्यापासून रशियाने इराणला इंधन पुरवठा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये रशियाने इराणला जवळपास ३० हजार टन इतका गॅसोलिन व डिझेलचा पुरवठा केला आहे. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी रशियाकडून इराणला रेल्वेमार्गाने इंधनाचा पुरवठायासाठी रशियाने कझाकस्तान व तुर्कमेनिस्तान या माजी सोव्हिएत देशांमधील रेल्वे नेटवर्कचा वापर करून इराणपर्यंत इंधनाचे रेक पोहोचवले आहेत. तर काही इंधनाचा पुरवठा इराणच्या शेजारी इराकमार्गेही करण्यात आल्याचा दावा केला जातो. याआधी रशियाने कॅस्पियन समुद्रमार्गाने इराणला इंधनाचा पुरवठा केला होता. पण पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यापासून इराणला सागरीमार्गाने इंधनाचा पुरवठा करणे रशियासाठी आव्हान ठरू लागले आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यापासून अमेरिका व पाश्चिमात्य मित्रदेशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. रशियन इंधन तसेच इतर मालाची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंधांची कारवाई केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, रशियाने मध्य आशियाई देशांबरोबर जोडलेल्या रेल्वेमार्गाने इराणपर्यंत इंधनाचा पुरवठा सुरू ठेवला आहे. येत्या काळात हा इंधन पुरवठा वाढेल, अशी अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे.

leave a reply