फेडरल रिझर्व्ह, ‘ईसीबी’ने केलेल्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअरबाजारांमध्ये घसरण

- नजिकच्या काळात दरवाढ थांबविण्याचे संकेत

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – अमेरिका तसेच युरोपच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या या घोषणेचे पडसाद शेअरबाजारांमध्ये उमटले असून अमेरिका, युरोप, आशिया व पॅसिफिक क्षेत्रातील शेअर निर्देशांकांमध्ये घसरण झाली. दरवाढीची घोषणा करतानाच अमेरिकेची ‘फेडरल रिझर्व्ह’ व ‘युरोपिअन सेंट्रल बँके’ने नजिकच्या काळात ही वाढ थांबविण्याचे संकेत दिले आहेत.

फेडरल रिझर्व्ह, ‘ईसीबी’ने केलेल्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअरबाजारांमध्ये घसरण - नजिकच्या काळात दरवाढ थांबविण्याचे संकेतबुधवारी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’चे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ करीत असल्याचे जाहीर केले. या दरवाढीनंतर अमेरिकेतील व्याजदर 5.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सात महिन्यांमधील ही पाचवी दरवाढ असून मार्च 2022 सालापासूनची 10वी दरवाढ ठरते. या सलग दरवाढीनंतर जून महिन्यात कदाचित दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार नाही, असे संकेत फेडरल रिझर्व्हच्या निवेदनातून समोर आले आहेत.

यापूर्वीच्या निवेदनांमध्ये महागाई निर्देशांकाच्या स्तराचा उल्लेख करून अधिक कठोर निर्णयांबाबत वक्तव्य करण्यात आले होते. मात्र यावेळी बँकेचे अधिकारी अर्थव्यवस्था, महागाई व वित्तीय बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून मग योग्य निर्णय घेतील, असे नमूद करण्यात आले आहे. धोरण योग्य दिशेने जात असून कदाचित दरवाढीबाबतच्या निर्णयांना विश्रांती दिली जाऊ शकते, असे फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी सांगितले. फेडरल रिझर्व्ह, ‘ईसीबी’ने केलेल्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअरबाजारांमध्ये घसरण - नजिकच्या काळात दरवाढ थांबविण्याचे संकेतअमेरिकेतील ‘बँकिंग क्रायसिस’ अद्याप संपला नसून कर्जमर्यादा वाढविण्याची टांगती तलवार अर्थव्यवस्थेवर कायम आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून दरवाढ थांबविण्याचे संकेत दिले जात असल्याचा दावा विश्लेषकांनी केला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हपाठोपाठ युरोपिय महासंघाची मध्यवर्ती बँक असणाऱ्या ‘युरोपिअन सेंट्रल बँके’नेही दरवाढीची घोषणा केली. ‘युरोपिअन सेंट्रल बँके’च्या प्रमुख ख्रिस्तिन लॅगार्ड यांनी व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ करीत असल्याचे सांगितले. युरोपिय देशांमध्ये महागाईचा दर अजूनही जास्त असल्याचे सांगून ही दरवाढ आवश्यक असल्याचे समर्थन लॅगार्ड यांनी केले. नव्या घोषणेनंतर ‘युरोपिअन सेंट्रल बँके’चा व्याजदर 3.25 टक्क्यांवर पोहोचला असून हा नोव्हेंबर 2008 सालानंतरचा उच्चांक ठरला आहे.

जगातील दोन प्रमुख मध्यवर्ती बँकांनी घेतलेल्या दरवाढीच्या निर्णयाचे पडसाद जागतिक शेअरबाजारांमध्ये उमटले. अमेरिका, युरोप, आशिया तसेच पॅसिफिक क्षेत्रातील शेअरनिर्देशांकांमध्ये घसरण झाली. फेडरल रिझर्व्ह, ‘ईसीबी’ने केलेल्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअरबाजारांमध्ये घसरण - नजिकच्या काळात दरवाढ थांबविण्याचे संकेतअमेरिकेतील डो जोन्स, ‘एसॲण्डपी’, ‘नॅस्डॅक’सह कॅनडा, मेक्सिको, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम या देशांमधील शेअरनिर्देशांक 0.5 ते एक टक्क्यांपर्यंत खाली आले. आशियात चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, इजिप्त तर पॅसिफिक क्षेत्रात ऑस्ट्रेलियाच्या शेअरनिर्देशांकामध्ये घसरण झाली.

गेल्या काही महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीसदृश वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक, संयुक्त राष्ट्रसंघटना, जागतिक व्यापार संघटना यासह अनेक आघाडीच्या संस्था तसेच वित्त क्षेत्रातील कंपन्यांनी 2023 सालात मंदीचा फटका बसेल, असे भाकित वर्तविले आहे. त्यासाठी जगातील प्रमुख देशांकडून व्याजदरात केली जाणारी वाढ हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. याची जाणीव असतानाही अमेरिका व युरोपातील मध्यवर्ती बँकांनी केलेली दरवाढ लक्ष वेधून घेणारी ठरते.

हिंदी

 

leave a reply