चीन नावाच्या गोरिलाला रोखायला हवे

- अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांचा इशारा

गोरिलावॉशिंग्टन – चीन नावाचा गोरिला तैवानवरून क्षेपणास्त्रे डागतो आहे आणि आपण या गोष्टी रोखणे महत्त्वाचे आहे, असे अमेरिकेच्या सातव्या आरमाराचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कार्ल थॉमस यांनी बजावले. चीनने तैवानला सर्व बाजूंनी घेरणारे युद्धसराव सुरू केले असून हवाई तसेच सागरी क्षेत्रावरून क्षेपणास्त्रांचा मारा चालू केला आहे. यामुळे या क्षेत्रात प्रचंड तणाव निर्माण झाला असून अमेरिकेने आपल्या युद्धनौका या क्षेत्रानजिक तैनात केल्या आहेत. इतर देशांनीही चीनच्या कारवाया रोखण्यासाठी हालचाली कराव्यात, अन्यथा भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होतील, याकडे व्हाईस ॲडमिरल कार्ल थॉमस यांनी आपल्या इशाऱ्यात लक्ष वेधले.

leave a reply