रशिया-चीनमधील वाढती जवळीक अमेरिकेच्या चिंता वाढविणारी

-रशियन राजदूतांचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को/बीजिंग – रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली भेट व त्यातून दिसणारी रशिया-चीनमधील वाढती जवळिक अमेरिकेच्या चिंता वाढविणारी ठरल्याचा दावा रशियाचे राजदूत ऍनातोली ऍन्टोनोव्ह यांनी केला आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये सुरू असलेल्या विंटर ऑलिंपिंक स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चीनला भेट दिली होती. या भेटीत रशिया व चीनदरम्यान अनेक महत्त्वाचे करार पार पडले असून दोन देशांनी संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले आहे. यावरून अमेरिकी माध्यमे व राजनैतिक वर्तुळात पडसाद उमटत असून रशियन राजदूतांचे वक्तव्य त्यावर आलेली प्रतिक्रिया मानली जाते.

रशिया-चीनमधील वाढती जवळीक अमेरिकेच्या चिंता वाढविणारी - रशियन राजदूतांचा दावागेल्या वर्षभरात अमेरिकारशियामधील संबंधांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. सायबरहल्ले, ऍलेक्सी नॅव्हॅल्नीची अटक, बेलारुस, नॉर्ड स्ट्रीम२ इंधनवाहिनी व युक्रेन ही तणावामागील प्रमुख कारणे ठरली आहेत. युक्रेन सीमेवरील रशियाच्या वाढत्या तैनातीने हा तणाव अधिकच चिघळत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांबरोबरील तणाव वाढत असताना रशियाने चीनबरोबरील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

रशिया-चीनमधील वाढती जवळीक अमेरिकेच्या चिंता वाढविणारी - रशियन राजदूतांचा दावादोन देशांमध्ये इंधन, अंतराळक्षेत्र, गुंतवणूक, चलनव्यवहार, बँकिंग, तंत्रज्ञान, शेती यासारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भेटीत १६ करार झाल्याचे सांगण्यात आले आहे. यात इंधनक्षेत्रातील दीर्घकालिन कराराबरोबरच अमेरिकेच्या ‘नेव्हिगेशनल सिस्टिम’ला आव्हान देणार्‍या कराराचाही समावेश आहे.

रशियाने विकसित केलेली ‘ग्लोनास’ व चीनने विकसित केलेली ‘बैडू’ या दोन्ही ‘नेव्हिगेशन सिस्टिम्स’मधील सहकार्य वाढविणारा करार पार पडला आहे. रशिया-चीनमधील वाढती जवळीक अमेरिकेच्या चिंता वाढविणारी - रशियन राजदूतांचा दावाया करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जीपीएस’ या अमेरिकी ‘नेव्हिगेशनल सिस्टिम’चा असलेला प्रभाव कमी होईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. नवा करार दोन्ही देशांमध्ये २०१८ साली झालेल्या प्राथमिक कराराचा पुढचा टप्पा असल्याचे सांगण्यात आले आहे. रशियाबरोबर करार करतानाच नाटो तसेच युक्रेनच्या मुद्यावर चीनने रशियाला समर्थन दिले आहे. ही बाब अमेरिकेच्या चिंता वाढविणारी ठरल्याचे संकेत अमेरिकी वर्तुळातून मिळत असल्याचे रशियाचे अमेरिकेतील राजदूत ऍन्टोनोव्ह यांनी म्हटले आहे.

leave a reply