हमासने नागरी भागात शस्त्रसाठा लपविला आहे

- इस्रायलच्या लष्कराची माहिती

एरेझ – इस्रायलवर हल्ला चढविण्यासाठी गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रांची मोठी जमवाजमव केली आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ले चढवून हा साठा नष्ट करू नये, यासाठी हमासने सदर शस्त्रास्त्रे शाळा, प्रार्थनास्थळे, क्रीडाकेंद्र, परदेशी कंपन्यांचे कारखान्यांखाली लपविले आहेत. इस्रायलच्या लष्कराने सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून हमासवर हा आरोप केला. गेल्या वर्षी इस्रायल आणि गाझापट्टीतील हमास यांच्यात भडकलेल्या संघर्षातही दहशतवाद्यांनी नागरी इमारती व वस्त्यांमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले होते. तर काही ठिकाणी दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या इमारतीचा वापर केल्याचेही उघड झाले होते. या इमारतींवर हल्ले चढविल्यानंतर जगभरातून इस्रायलवर जोरदार टीका झाली होती.

हमासनेयामुळे आत्मविश्वास बळावलेल्या हमासने गाझातील शाळा, रुग्णालय, क्रीडाकेंद्र, प्रार्थनास्थळ, संयुक्त राष्ट्रसंघाची ठिकाणे आणि अमेरिकन शीतपेय कंपनीखाली भुयारी मार्ग खोदून हमास ने शस्त्रसाठा लपविल्याचा आरोप इस्रायली लष्कर करीतआहे. हमासच्या या छुप्या ठिकाणांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स इस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केले.

याद्वारे इस्रायलने गाझापट्टीतील दहशतवादी संघटनांबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाला इशारा दिल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. येत्या काळात हमासने या ठिकाणांचा वापर करून इस्रायलवर हल्ले चढविले तर इस्रायलचे लष्कर देखील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करताना मागेपुढे पाहणार नसल्याचा संदेश इस्रायलच्या लष्कराने दिला आहे.

leave a reply