निदर्शकांना दहशतीखाली ठेवण्यासाठी इराणकडून मृत्यूदंडाच्या शिक्षेत मोठी वाढ

पॅरिस – गेल्या वर्षी इराणच्या राजवटीने किमान ५८२ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. २०२१ सालच्या तुलनेत गेल्या वर्षी या शिक्षेत ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. इराणच्या राजवटीविरोधात निदर्शने करणाऱ्या आणि राजवट उलथण्याच्या घोषणा देणाऱ्या निदर्शकांना घाबरविण्यासाठी इराणने मृत्यूदंडाच्या शिक्षेत वाढ केल्याचा दावा फ्रान्स तसेच नॉर्वेस्थित मानवाधिकार संघटनांनी केला.

निदर्शकांना दहशतीखाली ठेवण्यासाठी इराणकडून मृत्यूदंडाच्या शिक्षेत मोठी वाढ२०२१ साली इराणच्या राजवटीने ३३३ जणांना फाशी दिली होती. पण गेल्या वर्षी यामध्ये जवळपास ७५ टक्के वाढ झाल्याचे या मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे. कुर्द तरुणी माहसा अमिनीच्या संशयास्पद मृत्यूनंतर इराणमध्ये राजवटविरोधी आंदोलन पेटले होते. हिजाबसक्तीच्या विरोधातून सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये इराणमधील प्रत्येक गट, स्तरातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत ६०० हून अधिक जणांचा बळी गेला तर १८ हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले होते. इराणने यापैकी ५८२ जणांना मृत्यूदंड सुनावल्याचा दावा केला जातो. पण ही संख्या याहून अधिक मोठी असल्याचे आरोपही होत आहेत.

हिंदी

 

leave a reply