जम्मू-काश्‍मीरमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

- श्रीनगरमध्ये 100 फूट उंच तिरंगा फडकला

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये भारताचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी समारंभ उत्साहात साजरा झाला. विशेष म्हणजे या स्वातंत्र्यदिन समारोहात भाग घेण्यासाठी जम्मू-काश्‍मीर बाहेरूनही शकडो पर्यटक श्रीनगरमध्ये आले होते. तसेच इंटरनेट आणि मोबाईल सेवा खंडीत करण्याची वेळ आली नाही. याआधी दरवर्षी दहशतवादी व फुटिरतावाद्यांकडून बंदी घातली जात असे व धमक्या दिला जात असतं. तसेच कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होणे टाळत असत. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न झाल्यास तणाव निर्माण होत असे. मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे चित्र बदलेले दिसत आहे. गुरुवारी श्रीनगरच्या हरि पर्वत किल्ल्यावर 100 फूट उंच ध्वज फडकला. जम्मू-काश्‍मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी याला ऐतिहासिक घटना म्हटले आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा- श्रीनगरमध्ये 100 फूट उंच तिरंगा फडकलागेल्या तीस वर्षाहून अधिककाळ दहशतवादात होरपळत असलेला आणि पाकिस्तान समर्थक फुटिरतावाद्यांच्या कारवायांमुळे सदैव अशांत असलेल्या जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या दोन वर्षात चित्र पुर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटण्यात आले होते. याआधी श्रीनगर आणि काश्‍मीर खोऱ्यात स्वातंत्र्यदिनी भारतीय ध्वज फडकविण्यावर दहशतवादी व फुटिरांकडून बंदी टाकण्यात येत असे. तसेच काही हिंसक घटना घडत असत. दहशतवादी हल्ल्याचे सावट असे. श्रीनगरच्या प्रसिद्ध लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी प्रचंड बंदोबस्त ठेवावा लागे.

मात्र यावर्षी देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना जम्मू-काश्‍मीरमधील चित्र पुर्णत: बदललेले पहायला मिळाले. श्रीनगरच्या लाल चौकाला यावर्षी मोठी झगमागट होती. गेल्या आठवड्याभरापासून लाल चौकातील वॉच टॉवर तिरंगी रंगाच्या दिव्यांनी उजळून गेला होता. तसेच येथे डागडुजी करून नवी घड्याळे बसविण्यात आली. हे पाहण्यासाठी शेकडो पर्यटकही श्रीनगरला भेट देत होते. गुरुवारी श्रीनगरच्या शेर-ए-काश्‍मीर क्रिकेट स्टेडियममध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्‍मीर खोऱ्यात सामान्य युवकांची माथी भकडावून येथील जनतेला वेठीस धरण्याचे काम आतापर्यंत केले गेले. लोकशाहीची बिजे येथे रुजविण्याचे प्रयत्न झाले नाहीत, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभही सामान्यांना मिळू देण्यात आले नाहीत, ही बाब सिन्हा यांनी अधोरेखित केली.जम्मू-काश्‍मीरमध्ये स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा- श्रीनगरमध्ये 100 फूट उंच तिरंगा फडकला

आता येथील लोकशाही व्यवस्थेला मजबूत केले जात असून काश्‍मिरी नागरिकांच्या आकांशा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. दहशतवाद हा शांती आणि विकासासाठी अभिशाप आहे. शेजारी देेशाने याच दहशतवादाच्या सहाय्याने छुपे युद्ध पुकारले आहे. पण तरुणांची माथी भडकावून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांना यापुढे सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असे उपराज्यपाल सिन्हा म्हणाले. तसेच काश्‍मिरी तरुणांना अशा शक्तींपासून सावध राहण्याचा इशाराही सिन्हा यांनी दिला.

या कार्यक्रमात श्रीनगरचे महापौर जुनैद मट्टू यांनी काही जणांबरोबर काश्‍मिरी गाण्यांवर फेर धरला. तसेच काश्‍मीरमधील एका शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमात हिजबुल मुजाहिद्दीनचा चार वर्षांपूर्वी ठार झालेला कमांडर बुऱ्हाण वाणी याच्या वडीलांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दरम्यान, श्रीनगरच्या हरि पर्वत किल्ल्यावर 24 बाय 36 फुट आकाराचा 100 फुट उंच तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने मिळून हा तिरंग फडकवला असून उपराज्यपाल सिन्हा यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.

leave a reply