भारत आणि फिलिपाईन्समध्ये ‘बीआयटी’वर चर्चा सुरु

नवी दिल्ली – भारत आणि फिलिपाईन्समध्ये ‘द्विपक्षीय गुंतवणूक करार’संदर्भात (बीआयटी) चर्चेची पहिली फेरी सुरु झाली. गेल्या आठवड्यात भारत आणि फिलिपाईन्सच्या आर्थिक विभागाची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत उभय देशांमधील व्यापारी सहकार्य वाढविण्याचा निर्णय झाला होता.  कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत विविध देशांबरोबर व्यापारी सहकार्य वाढविण्यावर भर देत आहे. हे सहकार्य त्याचाच भाग ठरतो.

भारत आणि फिलिपाईन्समध्ये

‘बीआयटी’करारानुसार परस्पर देशांमध्ये परकीय गुंतवणूक करणे सोपे जाते. परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारताने १९९४ साली ब्रिटनसोबत पहिला ‘बीआयटी’ करार केला होता. त्यानंतर २००० सालानंतर भारताचा युरोपिय देशांबरोबर त्यानंतर इस्रायल, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ‘बीआयटी’ करार झाला होता. काही वर्षापूर्वी भारत आणि फिलिपाईन्समध्येही अशा करारासाठी प्रयत्न सुरु झाले. या करारासंदर्भातील मसुदाही तयार करण्यात आला. मात्र याबाबत चर्चा पुढे सरकत नव्हती. अखेर गेल्या आठवड्यात या करारासंदर्भात भारत आणि फिलिपाईन्समध्ये चर्चेची पहिली फेरी पडली. लवकरच उभय देशांमध्ये हा करार संपन्न होईल, असे अधिकांऱ्यानी म्हटले.

भारत आणि फिलिपाईन्समध्येगेल्या काही वर्षात भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर फिलिपाईन्समध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. भारताच्या विप्रो कंपनीने फिलिपाईन्सच्या पर्सनल केअर ब्रँड स्पाल्शचे २० कोटी डॉलर्सचे शेअर्स घेतले आहे. तर भारताच्या ‘जीएमआर’ ग्रुपने फिलिपाईन्समच्या ‘केबु’ आणि ‘क्लार्क’मध्ये विमानतळाचे प्रकल्प पूर्ण केले. तर फिलिपाईन्सच्या एका कंपनीने राजस्थान आणि गुजरातच्या सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘बीआयटी’ करारामुळे भारत आणि फिलिपाईन्समधील या व्यापाराला अधिक चालना मिळेल, असा विश्वास अधिकांऱ्यानी व्यक्त केला.

दरम्यान, भारत आणि फिलिपाईन्समध्ये ‘प्रिफ्रेशनल ट्रेड अॅग्रीमेंट’वर देखील चर्चा सुरु आहे.  यामुळे दोन्ही देशांमधील उत्पादनांवरील कर कमी होईल. भारत आणि फिलिपाईन्समधला द्विपक्षीय व्यापार २.३२ अब्ज डॉलर्सवर आहे. हा द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी हे दोन्ही करार उपयुक्त ठरतील, असा दावा केला जातो.

 

leave a reply